शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन

By नम्रता फडणीस | Updated: July 2, 2024 20:12 IST

आठवड्यातून २ वेळा पोलिस ठाण्यात हजेरी, जिल्ह्याची हद्द सोडून जाऊ नये, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये, आदी अटी-शर्तींवर जामीन

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात कार चालकाला धमकावून बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर प्रथमवर्गन्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी अटी शर्तींवर् जामीन मंजूर केला.

आठवड्यातून दोन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, जिल्ह्याची हद्द सोडून बाहेर जाऊ नये, तसेच पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये, आदी अटी-शर्तींवर न्यायालयाने अग्रवाल बापलेकाला जामीन मंजूर केला. त्यामुळे सुरेंद्रकुमार अग्रवाल कारागृहाबाहेर येणार असला तरी रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल मुक्काम येरवडा कारागृहातच असणार आहे.

'पोर्शे’ कार भरधाव चालवून तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला बंगल्यात डांबून ठेवत त्याचा मोबाइल फोन काढला. तसेच त्याला धमकावल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कदम आणि बचाव पक्षातर्फे अँड प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू