चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 10:01 IST2024-05-21T09:59:38+5:302024-05-21T10:01:20+5:30
Pune Porsche car accident : पुण्यातील अपघातातील पोर्शे कार प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
Pune Porsche car accident ( Marathi News ) पुणे : पुण्यात रविवारी पहाटे पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना समोर आली. यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेदांत अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली. आता या अपघात प्रकरणी मोठी माहिती उघड झाली आहे. अपघातातील पोर्शे कार विनानोंदणीच रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत बेदरकारपणे कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दुचाकी वरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अल्पवयीन असलेल्या कारचालकाला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र कारचालक अल्पवयीन असल्यामुळे कोर्टाने त्याला लगेच जामीनही दिला होता. त्यानंतर पुणे पोलिसांवर चहुबाजूनी टीका होत होती.
४० लाख रुपयांचा टॅक्स भरणा करायला सांगितले
नवीन कार घेतल्यानंतर कार नावावरुन करुन देण्याची संपूर्ण जबाबदारी शोरुम चालकाची असते. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तो पर्यंत वाहन मालकाला सोपवले जात नाही. मात्र, कल्याणीनगरमध्ये अपघात करुन दोघांचा बळी घेणारी पोर्शे ही अलिशान गाडी त्याला अपवाद ठरली आहे. नावावर करण्यासाठी २० मार्चला अर्ज करण्यात आला. त्या गाडीची पहाणी करुन सुमारे ४० लाख रुपयांचे टँक्स भरणा करायला सांगण्यात आले. मात्र, टँक्स न भरल्यामुळे नावावर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तसेच ही गाडी रस्त्यावर आणण्यात आली.
नवीन गाडी घेतल्यानंतर शोरुम चालकाकडूनच आरटीओकडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुनच मालकाला गाडी देणे आवश्यक आहे. परंतु ही अलीशान गाडी मुंबईतील एका डिलरने परराज्यातून २० मार्च रोजी गाडी आणून दिली आहे. गाडी नावावर करण्याची प्रक्रियेसाठी अर्ज ही करण्यात आला. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार सुमारे ४० लाख रुपयांचा कर भरण्यास सांगण्यात आले होते. कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी शोरुम चालकाची होती.
... म्हणून नावावर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही
२० मार्च २०२४ रोजी ही गाडी मुंबईतील एका शोरुमधून घेण्यात आली. मात्र, त्याची आरोटीओकडे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न करताच ती रस्त्यावर आणली. या संदर्भात ४० लाखांचा कर भरयाचा होता. पण तो भरला नाही, त्यामुळे गाडी नावावर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता त्यांना ज्या दिवसांपासून गाडी खरेदी केली आहे, त्या दिवसांपासून कराच्या रकमेवर दंडाची रक्कम आकारली जाईल.
- संजीव भोर, प्रभारी प्रदेशिक परिवहन अधिकारी, पुणे.