शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:38 IST

Pune CP Amitesh Kumar : पुणे अपघात प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आपली भूमिका स्पष्ट केली.

Pune porsche accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्याप्राशन करून अल्पवयीन मुलाने आलिशान कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतरपोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपी मुलाला जामीन मंजूर केला. यामुळे पुणे पोलिसांनी कोर्टासमोर योग्य पद्धतीने आपली भूमिका मांडली नाही असा दावा करण्यात येत होता. त्यावर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणाची माहिती दिली.

पुण्याच्या कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री भरधाव पोर्श कारने एका बाईकला धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र या प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असल्याने त्याची कोर्टाने जामिनावर सुटका केली. आरोपीला जामीन मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तसेच पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.  त्यानंतर आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. तसेच आरोपीवरील कारवाईसाठी सत्र न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

"व्हिडीओमध्ये आरोपी मद्यपान करताना दिसत आहे. यासाठी त्याने ऑनलाईन पेमेंट केले. आमच्याकडे असलेल्या पुराव्यावरुन आरोपी दारु प्यायला होता हे स्पष्ट झालं आहे. ब्लड रिपोर्ट आल्यानंतर त्याबद्दल सविस्तर खुलासा करण्यात येईल. कोर्टाने आरोपी हा दारुचा व्यसनी असल्याचे नमूद केलं आहे. रविवारी आम्ही कोर्टासमोर दोन अर्ज सादर केले होते. हा गुन्हा गंभीर असल्याने सज्ञान आरोपीप्रमाणे मुलाविरुद्ध कारवाई करण्यास परवानगी मिळावी, असा एक अर्ज होता. दुसरा अर्ज हा पहिल्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत आरोपीला १४ दिवसांसाठी रिमांड होममध्ये पाठवण्याचा होता. पण कोर्टाने दोन्ही अर्ज फेटाळले," अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

"पोलीस विभागाला कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जेणेकरुन जनमानसात पोलीस कारवाई करत नाही हा संभ्रम दूर व्हायला पाहिजे. जे जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. ही शासनाची भूमिका असल्याने पोलीस पहिल्या दिवसापासून याच मार्गावर चालत आहेत," असेही अमितेश कुमार म्हणाले.

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPuneपुणेPoliceपोलिसAccidentअपघात