Pune Police: रस्त्यावर तरुणाने धक्का दिला अन् तरुणीने दिला ‘शक्ती’चा ‘प्रसाद’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 08:26 PM2021-10-10T20:26:57+5:302021-10-10T20:27:01+5:30

नवरात्रीनिमित्त शारीरिक व मानिसक ताकद, कौशल्य, आत्मविश्वास निर्माण करुन स्वसंरक्षण तंत्र शिकविणारा शक्ती हा उपक्रम

pune police start new activity women self defence | Pune Police: रस्त्यावर तरुणाने धक्का दिला अन् तरुणीने दिला ‘शक्ती’चा ‘प्रसाद’

Pune Police: रस्त्यावर तरुणाने धक्का दिला अन् तरुणीने दिला ‘शक्ती’चा ‘प्रसाद’

Next
ठळक मुद्देशक्ती या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न असणार

पुणे : रस्त्यात जात असलेल्या तरुणीला समोरुन आलेल्या एका तरुणाने अचानक कमरेत हात घालून तिचा विनयभंग केला. मात्र, सावध असलेल्या या तरुणीने त्याला चारीमुंड्या चीत केले. रस्त्याने जात असताना एका तरुणीला जाणीवपूर्वक तो धक्का देतो. तेव्हा ही तरुणी त्याला असा काही धक्का देते की, तो आयुष्यभर ती गोष्ट लक्षात ठेवेल. महिलांना (self defence) स्वसंरक्षण तंत्र शिकवणारा शक्ती या उपक्रमाचे प्रात्याक्षिक (bmcc)  महाविद्यालय रोडवरील चंद्रकांत दरोडे हायस्कुलमध्ये आयोजित करण्यात आले होते. मुली, तरुणी, महिला यांना रस्त्यावर होणाऱ्या त्रासापासून स्वसंरक्षण करणाऱ्या या शक्ती तंत्राने विद्यार्थिनी भारावून गेल्या.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून शक्ती हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. नवरात्रीनिमित महिलांना स्वत:चे संरक्षण स्वत:च करण्याची शारीरिक व मानिसक ताकद, कौशल्य, आत्मविश्वास निर्माण करुन स्वसंरक्षण तंत्र शिकविणारा हा शक्ती उपक्रमचे आयोजन शनिवारी मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशन व चंद्रकांत दरोडे विद्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

पुणे शहर पोलीस (pune city police) महिला पथकाने ७ जणांचा एक गट तयार केला आहे. त्यात काही महिला व पुरुष अंमलदार आहे. ते महिलांना स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रात्याक्षिक देतात. चालताना कोणी गळ्यातील चैन खेचून घेतली तर त्याला कसे सामोरे जावे. बसमध्ये पाठीमागून कोणी जाणून बुजुन धक्का मारत असेल तर त्याला कसा धडा शिकवावा. रस्त्याने जाताना कोणी छेडछाड केली तर त्याला कसे उत्तर द्यावे, याचे प्रात्याक्षिक दिले जाते. तसेच शाळेतील मुलींना त्यात सामावून घेतले जाते.

''जिथे महिला महिलेचे सक्षमीकरण करते, तिथे विकसित व्यक्तीमत्व घडते. (self defence) बाबत अनेक सोसायट्यांमधून मागणी करण्यात येत होती. त्यातून शक्ती हा उपक्रम सुरु केला आहे. त्यातून महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न आहे असे पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.'' 

Web Title: pune police start new activity women self defence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.