शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सतीश वाघ खून प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश; दोन संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 20:08 IST

या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पुणे - भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय ५५) यांचे मंगळवारी पहाटे अपहरण करून खून करण्यात आला. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात मंगळवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला. अशात आता पोलिसांकडून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.दरम्यान, सतीश वाघ हे हडपसर भागातील मांजरी फार्म परिसरात वास्तव्यास होते. हडपसर परिसरात त्यांचा नावलौकिक होता. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात चौघांनी त्यांना जबरदस्तीने चार चाकी वाहनात बसवले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून घेऊन गेले. दरम्यान सतीश वाघ यांना गाडीत डांबून येत असताना एका नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली.वाघ कुटुंबीयांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत असताना मंगळवारी सायंकाळी शिदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. शिंदवणे घाटातून काही नागरिक जात असताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.सतीश वाघ यांच्या संपूर्ण अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची दिसून आले. याशिवाय मृतदेहाजवळ लाकडी दांडके ही होते. या दांडक्याने वाघ यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपी पसार झाले. अपहरण केल्यानंतर काही तासातच आरोपींनी सतीश वाघ यांचा खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांची १६ पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागले आहेत. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसकडून सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू