शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खाकी वर्दीआड दडलेला अलवार आवाज सोशल मीडियावर व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 5:58 PM

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोष्ट क्षणात व्हायरल होऊ शकते. आणि पोस्टमुळे ती व्यक्तीही जगभर प्रसिद्ध होते. हाच अनुभव पुणे पोलीस दलातील कॉन्स्टेबल सागर घोरपडे घेत आहेत.

पुणे :सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही गोष्ट क्षणात व्हायरल होऊ शकते. आणि पोस्टमुळे ती व्यक्तीही जगभर प्रसिद्ध होते. हाच अनुभव पुणे पोलीस दलातील कॉन्स्टेबल सागर घोरपडे घेत आहेत. त्यांनी गायलेले गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून त्यांना फोन येत आहेत. 

    सागर उर्फ विठ्ठल घोरपडे हे मूळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिवासी. २०१२साली ते पोलीस दलात सामील झाले. गाण्याची आवडही त्यांना लहानपणापासून होती. मात्र संगीताचे शास्त्रीय शिक्षण घेण्याचा योग आलेला नाही. गावी भजनी मंडळात ते साथीला गायचे. त्यांचा आवाज ऐकून इतर गावातले लोकही त्यांना गायला बोलवायचे. पुढे नोकरी सुरु झाली आणि गाणे मागेच राहिले. 

पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या मित्राने एक नव्या गाणे आणि संगीताचा ट्रॅक पाठवला आणि गाण्याचा आग्रह केला. सुरुवातीला त्यांनाही जमेल की नाही अशी शंका होती. पण त्यांनी सराव केला आणि ते गाणे रेकॉर्ड करून फेसबुकवर अपलोड केले. २७ डिसेंबरला अपलोड केलेले ते गाणे काही तासात व्हायरल झाले. अनेक फेसबुक पेज आणि युजर्सने ते शेअर केले. खाकी वर्दीच्या मागे दडलेल्या या अलवार आवाजाला अनेकांनी स्टेस्टसवर स्थान दिले. त्यांना अगदी दुबई, दक्षिण आफ्रीकेतूनही चाहत्यांचे फोन आले. पुण्यातल्याच नाही तर महाराष्ट्राल्या अनेक पोलीसांच्या ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या अनुभवाबद्दल लोकमतशी बोलताना ते म्हणाले की,' सुरुवातीला माझा आवाज लोकांना इतका आवडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता मिळणारा प्रतिसाद बघून मन भरून आलंय. आता कामासोबत गाणेही वाढवण्याचा विचार आहे. कला अनेकदा साद घालत होती पण तेव्हा वेळ देता आला नाही, आता मात्र मी गाण्याचे शिक्षण घेऊन त्याचा उपयोग सामाजिक कामासाठीही करण्याचा विचार करतो आहे'. 

अनेकदा चित्रपटातून, पुस्तकांमधून पोलिसांचे कठोर, रुक्ष असे चित्र रंगवले जाते. गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तींवर जरब ठेवण्यासाठी त्यांना तसे वागावेही लागते. पण त्यांच्यातही संवेदनशील, हळवा आणि कलाकार मनाचा माणूस असतो. तो प्रत्येकाला दिसतोच असेही नाही, पण म्हणून पोलिसांवर असा शिक्का मारणेही योग्य नाही. पोलिसांची ही प्रतिमा बदलण्याचाही यामागे उद्देश असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया