पुणे : पोलीस कर्मचाऱ्याची जंगलात गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 12:10 IST2018-05-14T12:10:55+5:302018-05-14T12:10:55+5:30

एका पोलीस कर्मचाऱ्यानं जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

Pune : police constable committed Suicide in the forest | पुणे : पोलीस कर्मचाऱ्याची जंगलात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीस कर्मचाऱ्याची जंगलात गळफास घेऊन आत्महत्या

पुणे - एका पोलीस कर्मचाऱ्यानं जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे. प्रल्हाद सातपुते असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रल्हाद सातपुते हे शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

यापूर्वी ते  शिरुर पोलीस स्टेशनमध्ये आपले कर्तव्य बजावत होते. सोमवारी (14 मे) सकाळी प्रल्हाद सातपुते यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सातपुते यांनी आपले आयुष्य का संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, सातपुते यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Pune : police constable committed Suicide in the forest