पुणे : पुणे पोलिसांनी मध्यप्रदेश उमरती गावात जाऊन मोठी कारवाई केली आहे. त्याठिकाणी असणाऱ्या गावठी पिस्तूलच्या कारखान्यावर छापा टाकला आहे. पोलिसांनी पिस्तूलसह दारू गोळाही जप्त केला आहे. तसेच ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यात वारंवार पिस्तूल जप्त केल्या जात आहेत. अल्पवयीन मुले, गुन्हेगार, राजकीय नेते यांच्याकडून पिस्तूल जप्त केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या गावठी पिस्तूल मध्यप्रदेश मध्ये असणाऱ्या उमरती गावात तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अशा वेळी त्यांनी थेट मध्यप्रदेश गाठून त्या कारखान्यावर छापा टाकला. व पिस्तूलसह दारुगोळा जप्त केला आहे. तसेच या पिस्तूल तयार करणाऱ्या ४७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. किरकोळ कारणावरूनही पिस्तुलाचा धाक दखवला जात आहे. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमारही केली जात आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अल्पवयीन मुले कोयत्याबरोबरच पिस्तूलचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. पोलीस तपासणीतही अनेक भागात गावठी पिस्तूल आढळून आले आहेत. अखेर त्याच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. या पिस्तूल येतात कुठून? याचा शोध घेत त्यांनी मध्यप्रदेशचे उमरती गाव गाठले. व त्याठिकाणी पिस्तूल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला आहे.
Web Summary : Pune police raided a gun factory in Madhya Pradesh's Umarti, seizing weapons and arresting 47 people. This action follows increasing gun-related crime in Pune, including use by minors.
Web Summary : पुणे पुलिस ने मध्य प्रदेश के उमरती में एक बंदूक फैक्ट्री पर छापा मारा, हथियार जब्त किए और 47 लोगों को गिरफ्तार किया। यह कार्रवाई पुणे में बंदूक से संबंधित अपराध बढ़ने के बाद की गई, जिसमें नाबालिगों द्वारा उपयोग भी शामिल है।