शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 12:30 IST

दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४  ते ३० तासांपर्यंत सुरू असतो..

पुणे : दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४  ते ३० तासांपर्यंत सुरू असतो. यात आकर्षक स्वरुपाचे देखावे, डीजे, बँड ,ढोल ताशा यांचा लवाजमा हे सारे सोबतीला असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील संपूर्ण गणेशोत्सवासोबतच विसर्जन सोहळा देखील अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. यामुळेच पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी  पुणकरांचे ट्विटर वर आपल्या भावना व्यक्त करून आभार मानले आहे. 

डॉ. वेंकटेशम यांनी " कसलाही भपका नाही.. मोठमोठ्या मूर्ती नाहीत.. मिरवणूक नाही सारं कसं साधेपणानं... शिस्तीत आणि पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेऊनच.. पुढल्या वर्षीही गणेशोत्सव प्रचंड उत्साहानं,पण अशाच शिस्तीनं, इकोफ्रेंडली पद्धतीनं साजरा होऊ दे..."अशा शब्दात ट्विट करून पुणेकरांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. 

पुण्यातील गणेश विसर्जन सोहळ्याला तशी फार प्रदीर्घ परंपरा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी देश विदेशातून लोक पुण्यात येतात. येथील विसर्जन सोहळ्यातील आकर्षक सजावट केलेल्या मिरवणुका, ढोल ताशांचे जल्लोष पूर्ण उत्साहात होणारे वादन, डीजेच्या तालावर एक दिवसांच्या वर चालणारा हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. मात्र या कालावधीत पर्यावरणाची देखील मोठी हानी होते. तसेच नागरिकांच्या आरोग्यही धोक्यात येते. तसेच पोलीस यंत्रणेवर देखील प्रचंड ताण येत असतो. पण यंदा कोरोनामुळे सर्वत्रच गणेशोत्सवावर मर्यादा आल्या तशा पुण्यात सुद्धा होत्या. त्यामुळे अगदी साधेपणाने गणेशाची मनोभावे सेवा करून ना मोठे देखावे, ना मंडप, ना मिरवणूका असे सर्वकाही दरवर्षीचा थाटमाट बाजूला ठेवत अगदी साधेपणाने व वेळेत गणेश विसर्जन सोहळा संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने कसबा गणपतीचे सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी मंडपातच विसर्जन करण्यात आले. मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी करण्यात आले.तिसरा मानाचा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या गुरुजी तालीम मंडळाने मोजक्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'श्रीं'ची आरती करून दुपारी एक वाजता गणरायाचे विसर्जन करत निरोप दिला.त्यानंतर दुपारी १ वाजून दहा मिनिटांनी मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या तुळशीबाग गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला.  मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा येथील 'श्रीं 'चे विसर्जन दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी करण्यात आले.

त्यामुळे डॉ. के. वेंकटेशम यांनी पुण्याच्या नागरिकांचे प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल ट्विट करून  आभार केले आहे..

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तTwitterट्विटरGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस