शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोऱ्या रोखण्याचा पुणे पॅटर्न

By admin | Updated: June 7, 2015 02:56 IST

गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १५० ने कमी झाले आहेत.

पुणे : गेल्या चार वर्षांपासून पुणेकरांची डोकेदुखी ठरलेले सोनसाखळीचे गुन्हे कमी करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल १५० ने कमी झाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यापर्यंत सोनसाखळी चोरीचे ३२२ गुन्हे घडलेले होते. परंतु चालू वर्षात मेअखेरीस १७२ गुन्हे घडलेले आहेत. पोलिसांनी यातील ६६ गुन्हे उघडकीस आणून ३१ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली आहे.रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या आणि तरुणींच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोनसाखळी चोरट््यांनी शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. आयुक्त पाठक यांनी सोनसाखळी चोरट््यांचा बंदोबस्त करून हे गुन्हे कमी करण्यासाठी नागपूरमध्ये राबवलेल्या उपाययोजना पुण्यात राबवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पाठक, सह आयुक्त सुनील रामानंद यांनी योजना तयार करून राज्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या ‘इराणी’ चोरट्यांच्या वस्त्यांची माहिती काढली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी पथके तयार करून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, मुंब्रा, नेरुळ, परळी वैजनाथ, पुण्यातील शिवाजीनगर आदी भागांमध्ये छापे टाकले. या ठिकाणांहून रेकॉर्डवरील तसेच सराईत सोनसाखळी चोरटे ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान काही चोरट्यांकडून सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. गेल्या पाच महिन्यांत पोलिसांनी ६६ गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हे कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासोबतच शहरातील रस्त्यांचा अभ्यास करून पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फिरून नाकाबंदी पॉइंट निश्चित केले. नाकाबंदी दरम्यान नेमक्या कोणत्या दुचाकी आणि चारचाकी तपासायच्या याच्या सूचना दिल्या. त्याची अंमलबजावणी स्थानिक पोलिसांकडून सुरूआहे. यासोबतच सोनसाखळी चोरट्यांच्या मोठ्या टोळ्याच गजाआड करण्यात यश आल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. (प्रतिनिधी)पोलीस आयुक्त के. के. पाठक, सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्या सूचनांनुसार गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार करून राज्यातील विविध भागांमध्ये वारंवार छापे टाकण्यात येत आहेत. त्यामुळे सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या पुण्यातील हालचाली कमी झाल्या आहेत. यासोबतच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास आता थेट पोलीस निरीक्षक करणार असल्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिल्यामुळे तपासात प्रगती होत आहे. - पी. आर. पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा