पुणे: जन्मदात्या आईच्या जीवावर मुलगा उठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईला शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला गेल्यानंतर दोन पोलीस मार्शल त्याठिकाणी गेले, आईला मारू नको, असे ते समजावून सांगत होते. मात्र, मद्यपी मुलाने दोन्ही पोलिसांना खाली पाडून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या गणवेशाची बटणे तोडली. आईला वाचविण्यासाठी आलेल्या पोलीस अंमलदारांना शिवीगाळ करून दमदाटी करणा-या मुलाला विश्रांतवाडी पोलिसांनीअटक केली आहे.
श्रेयश संजय कोराड (वय ३०, रा. फुलेनगर, येरवडा) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराने फिर्याद दिली आहे. हा प्रकार फुलेनगर येथील वि. द. घाटे शाळेशेजारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश काची यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, मुलगा मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन त्याच्या ५५ वर्षीय आईला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत आहे. पोलीस तातडीने तेथे पोहचले. श्रेयश कोराड याला समजावून सांगत असताना व आईला मारहाण करण्यापासून परावृत्त करत असताना श्रेयश याने फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडले. त्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सरकारी गणवेशाची बटणे तोडली. त्यांच्या मदतीला आलेल्या पोलीस अंमलदार धुगे यांना देखील शिवीगाळ करुन दमदाटी केली. या घटनेनंतर त्यांनी पोलीस मदत मागविली. तपास पथकाचे अंमलदार तेथे आल्यावर त्यांना देखील शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
Web Summary : In Pune, a drunk son attacked his mother and threatened police officers who intervened. He was arrested for assault and obstructing government officials. The incident occurred in Phulenagar; the accused is Shreyash Korad.
Web Summary : पुणे में, एक शराबी बेटे ने अपनी माँ पर हमला किया और हस्तक्षेप करने वाले पुलिस अधिकारियों को धमकी दी। उसे हमला करने और सरकारी अधिकारियों को बाधित करने के आरोप में गिरफ्तार किया गया। घटना फुलेनगर में हुई; आरोपी श्रेयश कोराड है।