पुणे: किरकोळ कारणावरून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 07:11 IST2018-03-01T07:11:17+5:302018-03-01T07:11:17+5:30

किरकोळ कारणावरून केलेल्या शिवीगाळीमुळे एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना विश्रांतवाडीत घडली.

Pune: One murder on minor grounds | पुणे: किरकोळ कारणावरून एकाचा खून

पुणे: किरकोळ कारणावरून एकाचा खून

विमाननगर : किरकोळ कारणावरून केलेल्या शिवीगाळीमुळे एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना विश्रांतवाडीत घडली.
अशोक नामदेव काची (वय ३५, रा. रमाबाईनगर, फिश मार्केटमागे, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे़ याप्रकरणी विशाल किसन राठोड (वय ३०, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) याला गुन्हे शाखेने जेरबंद केले. याप्रकरणी नीलेश ऊर्फ लखन कांबळे (वय २७, रा़ आंबेडकरनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांविषयी वाईट बोलल्यावरून अशोक काची आणि विशाल राठोड यांच्यात मंगळवारी सायंकाळी भांडणे झाली होती़ त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती़ अशोक काची हे पवार पेट्रोल पंपासमोरील मच्छी मार्केटच्या बाजूला असलेल्या पानपटरीबाहेर फुटपाथवर मंगळवारी रात्री झोपले होते़ सायंकाळी झालेल्या भांडणाच्या रागातून विशाल राठोड हा पहाटे अडीचच्या सुमारास मोटारसायकलवरून तेथे आला़ त्याने झोपलेले काची यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्यांचा खून केला.

Web Title: Pune: One murder on minor grounds