Pune: पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात, एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 23:16 IST2023-06-04T23:15:55+5:302023-06-04T23:16:49+5:30
Pune: पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात झाला आहे. वडकी येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान ही दुर्घटना घडली आहे. यात एक जणाचा मृत्यू झाला आहे.

Pune: पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात, एकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी
पुण्यामध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान मोठा अपघात झाला आहे. वडकी येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान ही दुर्घटना घडली आहे. यात एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत. या जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. अपघात घडताच पंचांनी रुग्णवाहिका बोलावून घेतली. त्यानंतर गंभीर जखमी आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. वडकी, पुणे येथे आयोजित बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात एक जणाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. हि घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी लवकरात लवकर बरे होऊन सुखरुप घरी यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मी परिस्थितीचा आढावा घेतला असून, प्रशासन व स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.