...म्हणून त्या तिघांनी त्याच्या नाकाचं हाड मोडलं; कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 10:53 IST2019-06-25T10:51:16+5:302019-06-25T10:53:29+5:30

पुण्यातील घटना; मारहाण करणाऱ्या तिघांचा शोध सुरू

in pune nose of a person fractured after three men beats him | ...म्हणून त्या तिघांनी त्याच्या नाकाचं हाड मोडलं; कारण वाचून चक्रावून जाल

...म्हणून त्या तिघांनी त्याच्या नाकाचं हाड मोडलं; कारण वाचून चक्रावून जाल

पुणे : पालखी पुण्यात कधी येणार या प्रश्नाचा राग आल्यानं तिघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. यामध्ये त्या व्यक्तीचं नाक फ्रॅक्चर झालं. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तिघांचा शोध सुरू आहे. 

पर्वती दर्शन येथील एस टी कॉलनीत तीन जण चहा पित असताना चेतन नवनाथ बाटे (वय 30 वर्षे) यांनी त्यांना पुण्यात पालखी कधी येणार, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचा तिघांना राग आला. त्यांनी चेतन बाटेंना बाजूला घेतलं आणि त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारला. यामुळे चेतन यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं. पुण्यात पालख्या येतात, त्यावेळी अनेक पाकीटमार शहरात येतात आणि हात साफ करतात. चेतन यांनी याच हेतूनं डिवचण्यासाठी प्रश्न विचारला असावा अशी तिघांची समजूत झाली.

विशेष म्हणजे चेतन यांना मारहाण करणाऱ्या तिघांवर पाकिटमारीचे गुन्हे दाखल आहेत. सनी सोनवणे (रा. घोरपडी पेठ), सँडी नायर (रा. गंज पेठ), अजय पटेल (रा. पर्वती दर्शन) अशी तिघांची नावं आहेत. चेतन यांनी जाणीवपूर्वक पुण्यात पालखी कधी येणार, असा समज झाल्यानं तिघांनी चेतन यांना मारहाण केली. या प्रकरणी चेतन यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून तिघांचा शोध सुरू आहे. 
 

Web Title: in pune nose of a person fractured after three men beats him

टॅग्स :Puneपुणे