चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून! पतीला जन्मठेप, मुलींना दिला अनोखा मोबदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:42 IST2025-08-02T10:42:03+5:302025-08-02T10:42:37+5:30
पत्नी बानू हिच्या खूनप्रकरणी मेहुणा युसुफ दावलसाब नदाफ याने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. हसनसाब बानूच्या चारित्र्यावर संशय घेत असे.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून! पतीला जन्मठेप, मुलींना दिला अनोखा मोबदला
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्याला पतीला जन्मठेप आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.आर. शेट्टी यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, तसेच दंड भरल्यास तिन्ही मुलींना प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
हसनसाब दस्तगीरसाब नदाफ (रा.चिंचवड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पत्नी बानू हिच्या खूनप्रकरणी मेहुणा युसुफ दावलसाब नदाफ याने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. हसनसाब बानूच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याच कारणाने आरोपीने ६ डिसेंबर २०१९ रोजी पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला. शेजारी राहणाऱ्या फिर्यादी मेहुण्याला जाऊन बहिणीचा खून केल्याचे सांगितले.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे कुंडलिक चौरे यांनी यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक आर.आर.ठुबळ यांनी तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट अंमलदार हवालदार डी.बी. बांबळे यांनी सहकार्य केले.