शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 21:17 IST

पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या विशेष न्यायालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात सावरकरांचे वंशज सिद्ध करण्यासाठी दोन वंशावळी सादर केल्या आहेत. दोन्ही वंशावळ्यांची तुलना करता, पहिल्या (२०२३) वंशावळीत सात्यकी सावरकर यांच्या आई हिमानी अशोक सावरकर यांचे नाव स्पष्टपणे नमूद आहे. मात्र, दुसऱ्या (२०२५) च्या वंशावळीत हिमानी सावरकर यांचे नाव गायब आहे ही विसंगती लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी शुक्रवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर या मुद्द्यांवर खुलासा मागवणारा अर्ज बचाव पक्षातर्फे न्यायालयात दाखल केला आहे.पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या विशेष न्यायालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. खटल्यादरम्यान सात्यकी सावरकर यांनी स्वत:ला सावरकरांचे वंशज सिद्ध करण्यासाठी सावरकर कुटुंबाची वंशावळी एप्रिल २०२३ मध्ये न्यायालयात सादर केली होती. मात्र, २५ एप्रिल २०२५ रोजी, राहुल गांधींचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या मागणीनुसार, सात्यकी सावरकर यांनी दुसरी नवीन वंशावळी न्यायालयात सादर केली. मात्र दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? असा सवाल बचाव पक्षाने उपस्थित केला. या उपस्थित मुद्द्यांवर न्यायालयाने सावरकर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. पुढची सुनावणी येत्या २९ जुलै रोजी होणार आहे. राहुल गांधी दोषी नाहीतविशेष न्यायालयात शुक्रवारी दुपारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावरील आरोप वाचून दाखवला. राहुल गांधी न्यायालयात प्रत्यक्ष हजर नव्हते. त्यांची बाजू मांडणारे ॲड. मिलिंद पवार यांनी “राहुल गांधी दोषी नाहीत” असा दावा न्यायालयात केला. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRahul Gandhiराहुल गांधी