पुणे : भूसंपादन आणि इतर कामांसाठी राज्य सरकारकडून निधी मिळूनही कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंक जोडची कामे का रखडली आहेत, असा सवाल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला.
पाटील यांनी कोथरूड मतदार संघातील विविध कामांसाठी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोथरूड मतदार संघातील सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण, बाणेर, बालेवाडी सर्व मिसिंग लिंकबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणातील तांत्रिक अडचणी, अतिक्रमणे याबाबत माहिती दिली. त्यावर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना या भागातील मिसिंग लिंकबाबत पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
Web Summary : Minister Chandrakant Patil questioned officials about delays in Kothrud's missing link projects despite available funds. He reviewed progress with municipal officers, addressing land acquisition and encroachment issues. The commissioner ordered a report on missing links.
Web Summary : मंत्री चंद्रकांत पाटिल ने निधि उपलब्ध होने के बावजूद कोथरुड की मिसिंग लिंक परियोजनाओं में देरी पर अधिकारियों से सवाल किया। उन्होंने भूमि अधिग्रहण और अतिक्रमण के मुद्दों को संबोधित करते हुए नगरपालिका अधिकारियों के साथ प्रगति की समीक्षा की। आयुक्त ने मिसिंग लिंक पर रिपोर्ट मांगी।