सीसीटीव्ही बसविताना आधुनिकतेचा विचार करू; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:17 IST2025-07-16T10:16:52+5:302025-07-16T10:17:16+5:30
सर्व शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्हीचे नेटवर्क सरकार वाढवत आहे. त्यांच्या देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी, जेणेकरून सरकार एवढी गुंतवणूक करत आहे, ती गुंतवणूक बऱ्याच काळासाठी उपयोगात येऊ शकेल.

सीसीटीव्ही बसविताना आधुनिकतेचा विचार करू; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन
पुणे : राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्याचवेळी देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली. त्यावर भविष्यकालीन आधुनिकतेचा विचार करूनच यंत्रसामग्री बसविली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.
सर्व शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्हीचे नेटवर्क सरकार वाढवत आहे. त्यांच्या देखभालीची यंत्रणा उभी करण्यात यावी, जेणेकरून सरकार एवढी गुंतवणूक करत आहे, ती गुंतवणूक बऱ्याच काळासाठी उपयोगात येऊ शकेल.
त्याचप्रमाणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या आधुनिकतेचा त्यात अंतर्भाव असेल का? आणि त्यानुसार यंत्रणा खरेदीच्या सूचना दिल्या जातील का, असे आमदार शिरोळे यांनी शिक्षणमंत्र्यांना विचारले.