शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं…

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 12:36 IST

या व्हिडिओत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परिसरातील लोकांना या आवाजाचा खूप त्रास होतो. मला गेल्या काही तासात अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले. 

पुणे - पुण्यातील भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेला गरबा कार्यक्रम बंद पाडला. कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत खासदार कुलकर्णी यांनी आयोजकांना जाब विचारला. दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हिडिओत मेधा कुलकर्णी म्हणाल्या, परिसरातील लोकांना या आवाजाचा खूप त्रास होतो. मला गेल्या काही तासात अनेक स्थानिक नागरिकांचे फोन आले. या परिसरात कॅन्सर झालेले पेशंट आहे  तसेच ९ ० वर्षांची महिला आहे. त्यांना या आवाजाचा त्रास होतो मागेही या परिसरात दहीहंडी झाली तेव्हा सुद्धा आवाजाची तक्रार मला आली होती. या परिसरातील आजी असेल, आजोबा असतील, लहान मुलं असतील, त्यांना या आवाजाचा  त्रास सहन करावा लागतोय.  आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम सुरू ठेवले जात होते. याबाबत प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांचा त्रास लक्षात घेऊन मी स्वतः जाऊन कार्यक्रम बंद पाडला, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. 

दरम्यान, परिसरातील अनेक नागरिकांनीही वाढलेल्या आवाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. कार्यक्रम अचानक थांबल्याने काही तरुणांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी खासदारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.  या घटनेनंतर गरबा आयोजक आणि प्रशासन यांच्यात जबाबदारी टाळण्याची स्पर्धा सुरू झाली असून, पुढील कारवाईबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MP Medha Kulkarni halts Garba event over noise complaints.

Web Summary : BJP MP Medha Kulkarni stopped a Pune Garba event due to excessive noise, following complaints from residents, including elderly and cancer patients. The event violated noise regulations, prompting Kulkarni's intervention after inaction from authorities. The incident sparked mixed reactions and a blame game.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmedha kulkarniमेधा कुलकर्णीBJPभाजपाgarbaगरबा