Video : कुस्तीला गालबोट ..! ११ लाखांच्या कुस्तीत थेट पैलवानावर हल्ला? मुळशीत नेमकं काय घडलं?

By किरण शिंदे | Updated: February 20, 2026 11:21 IST2026-02-20T11:19:06+5:302026-02-20T11:21:19+5:30

पौड गावात आयोजित स्पर्धेत तब्बल ११ लाखांची इनामी कुस्ती सुरू होती. दोन्ही पैलवान जवळपास तासभर झुंज देत होते.

pune news video Mulshi wrestling chaos A blow to wrestling A wrestler was directly attacked in a wrestling match worth 11 lakhs? What exactly happened in Mulshi? | Video : कुस्तीला गालबोट ..! ११ लाखांच्या कुस्तीत थेट पैलवानावर हल्ला? मुळशीत नेमकं काय घडलं?

Video : कुस्तीला गालबोट ..! ११ लाखांच्या कुस्तीत थेट पैलवानावर हल्ला? मुळशीत नेमकं काय घडलं?

पुणेपुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पौड येथे झालेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत ११ लाख रुपयांच्या इनामी कुस्ती दरम्यान घडलेल्या गोंधळाने कुस्तीप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पैलवान माऊली कोकाटे यांच्यात रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात समर्थकाने आखाड्यात घुसून थेट सिकंदर शेख यांच्यावर हात उगारल्याचा प्रकार घडला.

काय घडलं नेमकं?
पौड गावात आयोजित स्पर्धेत तब्बल ११ लाखांची इनामी कुस्ती सुरू होती. दोन्ही पैलवान जवळपास तासभर झुंज देत होते. निर्णायक क्षणी कुस्ती आक्रमक होताच दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये तणाव वाढला. याच वेळी माऊली कोकाटे यांचा एक समर्थक अचानक आखाड्यात घुसला आणि सिकंदर शेख यांच्यावर हात उगारल्याने मैदानात खळबळ उडाली. पुढील काही क्षणांत दोन्ही बाजूंचे समर्थक मैदानात उतरले आणि गोंधळ उडाला. पंच आणि आयोजकांनी हस्तक्षेप करून समर्थकांना बाहेर काढले व सामना पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान  मैदानातील गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुस्तीप्रेमींनी आयोजकांवर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले.  कुस्ती सुरू असताना समर्थक आखाड्यात घुसला कसा? सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी होत्या का? संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली का? या प्रश्नांची उत्तरे आयोजकांनी द्यावीत, अशी मागणी होत आहे.  


 
दीड तास झुंज, निकाल अनिर्णित
गोंधळानंतरही दोन्ही पैलवानांनी १५-२० मिनिटे झुंज दिली. दीड तास चाललेल्या लढतीत कोणताही स्पष्ट निकाल लागला नाही. अखेरीस आयोजकांनी दोन्ही पैलवानांना संयुक्त विजेता घोषित केले.
 
कुस्तीच्या परंपरेला धक्का?
कुस्ती म्हणजे शौर्य, परंपरा आणि खिलाडूवृत्ती यांचं प्रतीक मानलं जातं. मात्र मुळशीतील घटनेमुळे खेळाच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा आणि नियमांची अंमलबजावणी गरजेची असल्याचं मत व्यक्त होत आहे.

Web Title : कुश्ती में हंगामा: पहलवान पर हमला, मुल्शी में अफरातफरी!

Web Summary : मुल्शी में 11 लाख की कुश्ती में एक समर्थक ने पहलवान सिकंदर शेख पर हमला किया, जिससे अफरातफरी मच गई। लम्बी कुश्ती के बाद मैच ड्रा रहा। घटना सुरक्षा और खेल भावना पर सवाल उठाती है।

Web Title : Wrestling match marred by attack; chaos erupts in Mulshi.

Web Summary : Chaos erupted at an 11-lakh rupee wrestling match in Mulshi when a supporter attacked wrestler Sikandar Shaikh. The match ended in a draw after a prolonged struggle. The incident raises concerns about security and sportsmanship.