Video : मंचरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा..! मेधा कुलकर्णी आणि पोलिस आमने-सामने; नेमकं काय घडलं ?
By किरण शिंदे | Updated: March 7, 2026 17:20 IST2026-03-07T17:19:23+5:302026-03-07T17:20:11+5:30
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Video : मंचरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा..! मेधा कुलकर्णी आणि पोलिस आमने-सामने; नेमकं काय घडलं ?
पुणे - पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भातील वाद पुन्हा एकदा चिघळलाय. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शुक्रवारी मंचर येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मात्र या भेटीदरम्यान पोलिसांशी झालेल्या वादामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. यादरम्यानचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दर्गा आणि पांडवकालीन बारव संदर्भातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका दर्ग्याच्या भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी खाली मंदिर असल्याचा दावा काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दर्ग्याचे बांधकाम तात्पुरते थांबवले होते. या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी मेधा कुलकर्णी मंचर गेल्या. पाहणीदरम्यान त्यांनी त्या ठिकाणी हिंदू देवी-देवतांचा फोटो लावण्याचा आग्रह धरला. मात्र परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना तसे न करण्याची विनंती केली..मात्र त्यानंतरही मेधा कुलकर्णी फोटो लावण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी त्यांच्या हातातील देवाचा फोटो काढून घेतला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.
दरम्यान, दर्ग्याच्या परिसरात राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबांकडे मेधा कुलकर्णी यांनी आधारकार्डची मागणी केली. काही नागरिकांनी त्यांना ओळख असल्याचे सांगितले तरीही त्यांनी ओळखपत्र दाखवण्याची मागणी करत तेथील नागरिकांना प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळालं. या सर्व घडामोडींनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संबंधित दर्ग्याला कुलूप लावलं असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मंचर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील काळात या वादावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे