पुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ६) जाहीर झाला. यात ९५८ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यातील ५० हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील असल्याचे दिसून येत आहे. देशात अव्वल स्थान डॉ.अनुज अग्निहोत्री यांनी पटकावला असून, राजेश्वरी सुवे एम द्वितीय, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान प्राप्त केले आहे.
यूपीएससीतर्फे ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर, नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली.
जाहीर केलेल्या निकालामध्ये ३४८ उमेदवारांची शिफारस तात्पुरत्या स्वरूपातील आहे, तर २ उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. संबंधित प्राधिकरणांकडून सर्व आरक्षण दाव्यांची अंतिम पडताळणी केली जाणार असल्याचे निकालाच्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
---------
सेवा पदसंख्या
भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) - १८०
भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) - ५५
भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) - १५०
केंद्रीय सेवा गट अ ५०७, केंद्रीय सेवा गट ब १९५
Web Summary : Over 50 Maharashtra students cleared the UPSC exam, with Dr. Anuj Agnihotri securing the top rank nationally. Rajashree Suve and Akash Dhul achieved second and third positions respectively. The UPSC recommends 958 candidates for various civil services.
Web Summary : यूपीएससी परीक्षा में महाराष्ट्र के 50 से अधिक छात्र उत्तीर्ण हुए, डॉ. अनुज अग्निहोत्री ने राष्ट्रीय स्तर पर शीर्ष स्थान प्राप्त किया। राजश्री सुवे और आकाश धुल ने क्रमशः दूसरा और तीसरा स्थान प्राप्त किया। यूपीएससी ने विभिन्न सिविल सेवाओं के लिए 958 उम्मीदवारों की सिफारिश की।