दिवे घाटातील रस्तारुंदीकरणामुळे आज तीन तास वाहतूक बंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 10:35 IST2025-09-12T10:35:05+5:302025-09-12T10:35:21+5:30

दिवेघाटातील काम सध्या सुरू असून रुंदीकरणासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार

pune news traffic closed for three hours today due to road widening at Dive Ghat | दिवे घाटातील रस्तारुंदीकरणामुळे आज तीन तास वाहतूक बंद  

दिवे घाटातील रस्तारुंदीकरणामुळे आज तीन तास वाहतूक बंद  

पुणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाचे सध्या काम सुरू असून, हडपसर ते दिवेघाट या रस्ता रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी दिवेघाटात खडकात ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने शुक्रवारी (दि. १२) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत घाटातील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवेघाटातील काम सध्या सुरू असून रुंदीकरणासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांसाठी कात्रज-बोपदेव घाट (राज्यमार्ग क्र. १३१) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. ११९) मार्गे सासवड तसेच हडपसर-उरुळी कांचन-शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. ६१) सासवड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.

वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे. गरजेनुसार ब्लास्टिंगचे काम असल्यास त्या दिवशी रस्ता बंद होईल. त्यासाठी वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: pune news traffic closed for three hours today due to road widening at Dive Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.