शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

सिंहगड किल्ल्यावर पर्यटक बेपत्ता;तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळल्याची शंका; शोध कार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:28 IST

- गौतम लघुशंका करून येतो म्हणून मित्रांपासून काहीसा बाजूला गेला. आणि इथेच घात झाला, बराच वेळ झाला.. गौतम परत आलाच नाही.

पुणे - राज्यभरात सध्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रालाच पावसाने झोडपले आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातय. तर दुसरीकडे मात्र वर्षाविहारासाठी तरुणाई मोठ्या संख्येने डोंगरदऱ्यात जाताना दिसतेय. पुण्याजवळ असणाऱ्या प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर देखील पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतोय. मात्र पर्यटन करताना काळजी घेणही तितकंच गरजेचं असतं.

पुरेशी खबरदारी घेतली नाही तर अपघात अटळ असतो. आणि अशीच काहीशी घटना सिंहगड किल्ल्यावर घडली. हैदराबाद येथून मित्रांसह पर्यटनासाठी आलेला एक २ ४  वर्षांचा तरुण बुधवारी दुपारपासून अचानक बेपत्ता झाला. सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा इथून तो खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे. मात्र २ ४  तासानंतरही या तरुणाचा शोध लागलेला नाही.

नेमकं काय घडलं ?अधिकच्या माहितीनुसार, गौतम गायकवाड या तरुणाचं नाव असून तो मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा रहिवाशी आहे.  गौतम सध्या हैदराबाद मध्ये वास्तव्यास असतो. बुधवारी ( दि. २ ० ) दुपारी तो मित्रांसह सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हे सर्व मित्र किल्ल्यावरील तानाजी कडया जवळ पोहोचले. यावेळी गौतम लघुशंका करून येतो म्हणून मित्रांपासून काहीसा बाजूला गेला. आणि इथेच घात झाला, बराच वेळ झाला.. गौतम परत आलाच नाही. त्यानंतर मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र गडावरील तानाजी कडा परिसरात तो कुठेच आढळला नाही. मात्र जवळच त्याची चप्पल दिसली. परंतु गौतमचा ठावठिकाणा काही लागला नाही. अखेरीस गौतमच्या मित्रांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कशाला फोन करून गौतम बेपत्ता झाल्याची माहिती दिली.या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हवेली आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधत त्यांना देखील गौतम बेपत्ता झाल्याची माहिती दिली. आणि त्यानंतर शोधकार्य सुरू झालं. घनदाट धुक्यामुळे जमिनीचा अंदाज न आल्यामुळे गौतम थेट तानाजी कड्यावरून खाली कोसळल्याच समोर आलं. दरम्यान, सिंहगड परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याशिवाय वाऱ्याचा वेग ही प्रचंड आहे.. घनदाट धुकं पसरलं असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते.अखेरीस लघुशंकेसाठी गेलेला गौतम धुक्यामुळे जमिनीचा अंदाज न आल्याने खोल दरीत कोसळला असल्याचं समजलं.समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रात्री ११ वाजता अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं.  पोलिसांसह रेस्कु पथकही शोधकार्यात सहभागी आहे. मात्र सायंकाळी ४ पर्यंत तरी गौतमचा शोध लागला नाही. या घटनेमुळे सिंहगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत. पुढील काही तासांत शोधकार्याला यश मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सिंहगड किल्ल्यावर दुर्घटना होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.यापूर्वी देखील अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. पर्यटनस्थळ म्हणून सिंहगड किल्ल्यावर हजारो नागरिक फिरायला येतात. अशावेळी अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही काळापूर्वी देखील सिंहगड कड्यांवरून घसरून पर्यटक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी