शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिवज्योत आणताना काळाने गाठलं; मावळमध्ये भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

By किरण शिंदे | Updated: March 6, 2026 09:28 IST

या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात शोककळा पसरली आहे.

पुणे - शिवजयंतीच्या दिवशी मावळ तालुक्यातील शिवभक्तांवर दुर्दैवी काळाने घाला घातला. शिवज्योत घेऊन गावाकडे परतणाऱ्या दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आंदर मावळ परिसरात शोककळा पसरली आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे असे मृत्यू झालेल्या शिवभक्तांची नावे आहेत. हे दोघेही मावळ तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी होते.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ओंकार आणि दर्शन शिवजयंतीनिमित्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन मोठ्या उत्साहात गावाकडे परतत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्तांनी पारंपरिक पद्धतीने किल्ल्यावरून शिवज्योत आणण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान, जुन्या पुणे–मुंबई महामार्गावरील नायगाव परिसरात हे शिवभक्त मध्यरात्रीच्या सुमारास, सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पोहोचले होते. त्यावेळी ते शिवज्योत घेऊन धावत असतानाच विरुद्ध दिशेने येणारी एक कार अचानक दुभाजक ओलांडून त्यांच्या दिशेने आली. कारचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत या दोघांना जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत ओंकार आरडे आणि दर्शन शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे शिंदेवाडी तसेच आंदर मावळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. शिवजयंतीच्या दिवशीच दोन तरुण शिवभक्तांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy strikes near Pune: Two young men die in Shivjyot accident.

Web Summary : Two Shivbhakts died in a tragic accident near Pune while carrying Shivjyot. The accident occurred when a car hit them near Naigaon on the Pune-Mumbai highway. Omkar Arde and Darshan Shinde, residents of Shindewadi, died on the spot, casting a pall of gloom over the region.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र