शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पीक विमा योजनेत सहभागासाठी सव्वातीन लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:22 IST

- ज्वारीसाठी शेवटचे दोन दिवस, कांदा, गहू, हरभऱ्यासाठी १५ डिसेंबरची मुदत 

पुणे : रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ज्वारी उत्पादकांना शेवटचे दोन दिवस उरले आहेत. आत्तापर्यंत राज्यात सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा ५५ लाख इतका होता. गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबरची मुदत असल्याने सहभागी शेतकरी अर्जांची संख्या वाढेल, अशी आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमध्ये लातूर विभागाने आघाडी घेतली असून या विभागात आतापर्यंत १ लाख ३६ हजार शेतकरी अर्ज संख्या आहे तर संभाजीनगर विभागात ७८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत.

केंद्र सरकारने रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा कांदा भात आणि उन्हाळी भुईमूग या सहा पिकांसाठी विमा योजना जाहीर केली आहे. ज्वारी पिकासाठी विमा उतरवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे सहभागासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. तर गहू हरभरा व कांदा पिकासाठी ही मुदत १५ डिसेंबर अशी आहे. उन्हाळी भात व भुईमूग पिकासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ अशी ठेवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ६५ हजार ११ शेतकऱ्यांनी ३ लाख २६ हजार १६८ अर्ज केले आहेत. या अर्जांनुसार २ लाख ६ हजार ९९५ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. गेल्या वर्षी या योजनेत २८ लाख ५३ हजार ४९९ शेतकऱ्यांनी ५५ लाख १७ हजार ८१४ अर्ज आले होते.

रब्बी हंगामात सबंध राज्यभर गहू व हरभरा या दोन पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते तसेच ओलिताची सोय असलेल्या जिल्ह्यांमध्ये कांद्याचे क्षेत्रही मोठे असते. या तिन्ही पिकांसाठी विमा योजनेत सहभागासाठीची अंतिम मुदत १५ डिसेंबर असल्याने पुढील दोन आठवड्यांत सहभागी शेतकऱ्यांच्या अर्जांची संख्या वाढेल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 विभागनिहाय अर्ज संख्या

कोकण- ६

नाशिक- ७९४६

पुणे- ४३०२७

कोल्हापूर- १९६४९

संभाजीनगर- ७९३९९

लातूर- १३७००१

अमरावती- ३७४५२

नागपूर- १५१९

एकूण- ३२६१६८ 

फळपीक योजनेत २ लाख १३ हजार अर्ज

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत आंबिया बहार (रब्बी) मध्ये आतापर्यंत २ लाख १३ हजार ६५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी २ लाख ३५ हजार ७२५ अर्ज आले होते. काजू, संत्रा व आंबा (कोकण विभागासाठी) फळपिक विमा योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. आंबा पिकासाठी कोकण विभाग वगळून इतर जिल्ह्यांसाठी ३१ डिसेंबर व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Three Lakh Applications Received for Rabi Crop Insurance Scheme

Web Summary : Over three lakh applications received in Maharashtra for Rabi crop insurance. Farmers rush before deadlines for Jowar, Wheat, Gram, and Onion. Latur division leads in applications. Fruit crop insurance sees 2.13 lakh applications.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र