शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:45 IST

- नागरिकांची व राजकीय मंडळीची महापौरांच्या कृतीवर नकारात्मक प्रतिक्रिया

पुणे : सामाजिक हितासाठी होणाऱ्या आंदोलनामध्ये महापौरांनी सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. एखाद्या हिंसक आंदोलनात सहभागी होणे, हे महापौरपदाच्या गरीमेला बाधा पोहचवणारे आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या आंदोलनात महापौरांनी सहभाग घेणे चुकीचे आहे. महापौर या शहराच्या प्रथम नागरिक आहेत. आता त्या कुण्या एका पक्षाच्या नाहीत. त्यांनी यापुढे काळजी घ्यायला हवी, अशा प्रतिक्रिया पुणेकर नागरिकांनी दिल्या आहेत. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने रविवारी काँग्रेसभवन जवळ आंदोलन केले. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर मंजुषा नागपूरे यांनी सहभाग नोंदवत भाषण केले. इतर पदाधिकाऱ्यांनीही यावेळी भाषणे केली. या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस भवनच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेस भवनात जमलेले कार्यकर्तेही आक्रमक झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही कार्यकर्ते, पोलिस व पत्रकार जखमी झाली. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, आंदोलनामध्ये महापौर मंजुषा नागपूरे यांनी सहभाग घेऊन राजकीय भाषण केल्याने त्यांच्या या भूमिकेबद्दल राजकीय व सामाजिक स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापौरांनी व्यापक समाज हिताच्या आंदोलनामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. मात्र, अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनात सहभागी होऊन भाषण करणे चुकीचे व महापौर पदाची गरीमा बाधीत करण्यासारखे असून, महापौरांनी या हिंसक आंदोलनात सहभागी होणे टाळले असते, तर बरे झाले असते, असे मत व्यक्त केले जात आहे. महापौरांच्या आंदोलनातील सहभागावर मित्र पक्षाच्या नेत्यांनी उघडपणे टीका केली आहे. भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचीही नाराजीबिनविरोध नगरसेवक आणि त्यानंतर बिनविरोध महापौर होऊन इतिहास घडविलेल्या महापौर मंजुषा नागपूरे यांनी भाजपच्या राजकीय आंदोलनात सहभाग घेतल्याने विविध घटकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. मात्र, त्यांच्या आंदोलनातील सहभागावर खुद्द भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी खासगीत बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. आमची नावे कुठेही येऊ देऊ नका, अशी विनंतीही त्यांनी माध्यमांकडे केली आहे. 

राजकीय कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी ठीक आहे. मात्र, संविधानिक पद असलेल्या व्यक्तीने राजकीय आंदोलनापासून दूर राहणे गरजेचे आहे. महापौर तर शहराच्या प्रथम नागरिक असतात. त्यामुळे महापौरांनी कुण्या एका पक्षाचे नव्हे, तर शहराचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. महापौर पदावर निवड झालेली व्यक्ती पक्षाच्या बाहेर गेलेली असते. त्यामुळे महापौरांनी राजकीय आंदोलनात सहभागी होणे चुकीचे आहे.  - विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्तेविधायक कामे, सामाजिक हितासाठी आंदोलनात महापौर यांनी सहभाग घेतला तर काही गैर नाही. मात्र, महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे महापौर यांनी राजकीय अथवा पक्षीय आंदोलनात सहभागी होणे अपेक्षित नाही. महापौर म्हणून त्यांनी काही नैतिक बंधने पाळली पाहिजेत. - अंकुश काकडे, माजी महापौर, पुणे महापालिकाभाजपने टिपू सुलतान विरोधात आंदोलन केले आणि आंदोलनात हिंदूंची, बहुजनांची डोकी फोडली. विशेष म्हणजे पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक महापौर मंजूषा नागपुरे या आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. महापौर होणारी व्यक्ती कुठल्याही एका राजकीय पक्षाची राहात नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने अशा प्रकारच्या राजकीय आंदोलनांना सहभागी होणे चुकीचे आहे. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पुणेकरांची डोकी फुटणे, हे दुर्दैवी असून, महापौरांचे हे वर्तन कुठेतरी चुकीचे आहे. - रवींद्र धंगेकर, माजी आमदार, उद्धवसेना महापौर मंजूषा नागपुरे यांना महापौर पदाची गरिमा शिकवणे गरजेचे आहे. महापौर पदाची शिस्त काय आहे, हे शिकवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौर नागपुरे यांचा लवकरच क्लास घ्यावा. महापौरांनी राजकीय आंदोलनात सहभागी झालेला दिवस काळा दिवस म्हणून इतिहासात नोंद होईल. - रूपाली पाटील-ठोंबरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार) राजकीय पक्ष कोणताही असो, त्यामध्ये धिंगाणा घालणारे, हिंसा करणारे कमी-जास्त प्रमाणात काही कार्यकर्ते असतातच. आंदोलनाच्या वेळी हिंसा झाल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिस गुन्हे दाखल करतात. अशावेळी महापौर पदासारख्या व्यक्तीने या सर्वांपासून दूर राहणे अपेक्षित आहे. हिंसक आंदोलनात गुन्हा दाखल झाला तर केवळ महापौर असलेल्या व्यक्तीचे नव्हे, तर शहराचे नाव खराब होते. त्यामुळे महापौरांनी यापुढे काळजी घेणे गरजेचे आहे. - जयराम नागरगोजे, ज्येष्ठ नागरिक. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mayor represents city, not party; participation in protest wrong.

Web Summary : Pune citizens criticize the Mayor's participation in a BJP protest that turned violent. They argue the Mayor should represent the city, not a political party, and maintain the dignity of the office by avoiding partisan events. The mayor's actions have drawn criticism from multiple parties.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाcongressकाँग्रेस