शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एकाचे काढुन दुसऱ्याला देण्यात सरकारला रस नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:53 IST

- चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे.

पुणे: एकाच्या ताटातील काढुन घेऊन ते दुसऱ्याला द्यायचे असे करण्यात आमच्या सरकारला रस नाही, टिकणारे आरक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी बावनकुळे मंगळवारी पुण्यात आले होते.

मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी सरकार आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या आरोपांचा नकार केला. ते पुढे  म्हणाले, चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे. तोडगा मिळत नाही तोपर्यंत आंदोलकांशी चर्चा करणार तरी कशी? त्यांची मागणी सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी आरक्षण, तेही ओबीसी कोट्यातून अशी आहे. हे करता येणार नाही. घटनेची चौकट आहे. मग काय करता येईल यावर विचार करूनच आम्ही कुणबी नोंदी तपासण्याचा व ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागेच घेतला. त्याप्रमाणे कामही सुरू आहे. मराठवाड्यात अशी कितीतरी प्रमाणपत्र वितरीतही करण्यात आली.

ते काम थांबलेले नाही, सुरूच आहे हे आंदोलकांनी लक्षात घ्यायला हवे असे बावनकुळे म्हणाले. आरक्षण द्यायचे तर किमान काही पुरावा असावा. ज्यांचे असे पुरावे मिळतात, त्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र दिले जाते. पुरावेच नाहीत, त्यांना देता येणार नाही. घटनेच्या चौकटीबाहेर जाऊन काहीच करता येणार नाही. न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत काही आदेश दिले आहेत. त्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा आहे. न्यायालयाने सरकारलाही आदेश दिलेत. त्याप्रमाणे सरकारने कारवाई सुरू केली आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.सरकारमध्ये या आरक्षण विषयापासून उपमुख्यमंत्री अजित पवार अलिप्त दिसतात, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा हा प्रकार आहे का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. आमचे २३७ आमदार आहेत. ५१ टक्के मते घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. राज्यातील १४ कोटी जनतेची देवेंद्र फडणवीस सरकारला मान्यता आहे. तीनही पक्षांचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यांच्यात संवाद आहे. त्यांनी दररोज एकमेकांबरोबर बोललेच पाहिजेत असा आग्रह कशासाठी? न बोलताही ते काम करत आहेत असा दावा बावनकुळे यांनी केला. कसबा गणपतीबरोबरच शहरातील मानाच्या पाचही गणपतींचे दर्शन.बावनकुळे यांनी घेतले. त्यांच्यासमवेत राजेश पांडे तसेच भारतीय जनता पक्षाचे अन्य संघटनात्मक पदाधिकारी होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षणChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे