पुणे : कोथरूड भागातील एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्यास जाब विचारल्याने दहशत माजवल्याची घटना घडली. टोळक्याने जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी सहाजणांना अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूडमधील मयूर काॅलनीत असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या परिसरात एक गुदाम आहे. गुरुवारी (दि. ९) रात्री ११ वाजेच्या सुमारास गुदामातील कामगार सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर एकाचा वाढदिवस साजरा करत होते. आरडाओरडा करत असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी टोळक्याने त्यांना हटकले. प्रवेशद्वारासमोर गोंधळ घालू नका, असे रहिवाशांनी त्यांना सांगितले. त्यावेळी टोळक्यातील एकाने त्याच्याकडील तीक्ष्ण शस्त्र उगारून दहशत माजवली.
सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेची माहिती तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने त्वरित पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या टोळक्यातील सहाजणांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक करिश्मा शेख यांनी दिली.
Web Summary : A birthday celebration outside a Kothrud society turned violent when residents intervened. The revelers threatened and abused a senior citizen. Police arrested six people, including one minor, for disturbing the peace and inciting fear.
Web Summary : कोथरूड में एक सोसायटी के बाहर जन्मदिन का जश्न हिंसक हो गया जब निवासियों ने हस्तक्षेप किया। जश्न मनाने वालों ने एक वरिष्ठ नागरिक को धमकी दी और गाली दी। पुलिस ने शांति भंग करने और डर पैदा करने के आरोप में एक नाबालिग सहित छह लोगों को गिरफ्तार किया।