राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:53 IST2025-11-02T18:53:24+5:302025-11-02T18:53:50+5:30
नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे ११ ते १४, आणि २०, २१, २४, २५ ते २७ नोव्हेंबर राेजी या मुलाखती हाेणार आहेत. परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार
पुणे : राज्य लोकसेवा आयोगाने छाननीअंती मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. ११ ते २७ नाेव्हेंबर दरम्यान हाेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे ११ ते १४, आणि २०, २१, २४, २५ ते २७ नोव्हेंबर राेजी या मुलाखती हाेणार आहेत. परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यात सहयोगी प्राध्यापक, पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ पदासाठी ११ नोव्हेंबर, सहायक प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब पद आणि सहयोगी प्राध्यापक, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-अ पदासाठी १२ नोव्हबर, सहायक प्राध्यापक, किरणोपचारशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब पदासाठी १३ नाेव्हेंबर राेजी मुलाखत घेतली जाईल.
त्यानंतर सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रस्तोतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ पद आणि सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब पदासाठी १३ व १४ नोव्हेंबर राेजी, सहायक प्राध्यापक, अंतःस्रावशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब पदासाठी १४ नोव्हेंबरला, तर सहयोगी प्राध्यापक, संस्कृत संहिता सिद्धान्त, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ पदासाठी २० नोव्हेंबर राेजी मुलाखत हाेणार आहे.
याचबराेबर सहयोगी प्राध्यापक, स्वस्थवृत्त, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ पदासाठी २१ नोव्हेंबरला, सहयोगी प्राध्यापक, भौतिकशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग पदासाठी २४ आणि २५ नोव्हेंबर, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-अ पदासाठी २५ ते २७ नाेव्हेंबर राेजी मुलाखती हाेतील. उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.