शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

‘सोमेश्वर’चं ठरलं...! ३५ हजार एकरांवरील ऊस उपलब्ध; १४ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:32 IST

बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, त्यांच्या पत्नी रोहिणी जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे आणि त्यांच्या पत्नी प्रतीक्षा कांबळे यांच्या हस्ते

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येत्या गाळप हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला असून, ३५ हजार एकरांवरील साडेबारा लाख टन सभासदांचा आणि दीड ते दोन लाख टन गेटकेन ऊस अशा एकूण १४ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर कारखान्याचा ६४ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सभासद, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, अधिकारी-कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने हंगाम यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त केला.

बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, त्यांच्या पत्नी रोहिणी जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे आणि त्यांच्या पत्नी प्रतीक्षा कांबळे यांच्या हस्ते झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह संचालक मंडळ, कामगार आणि अधिकारी उपस्थित होते. 

हंगामाची तयारी पूर्ण; हार्वेस्टरचा वापर वाढवला -

सोमेश्वर कारखान्याकडे ३५ हजार एकर ऊस क्षेत्राची नोंद असून, यापैकी ३१ हजार ५०० एकरांतून ऊस उपलब्ध होईल. हंगामासाठी २२६० बैलगाड्या, ६२० डम्पिंग-ट्रॅक्टर, ३९१ ट्रॅक्टर आणि २० ट्रक यांचे करार पूर्ण झाले आहेत. मजूर टंचाई लक्षात घेता, कारखान्याने प्रथमच २४ हार्वेस्टरशी करार केले आहेत. हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन जमिनीचा पोत सुधारत असल्याचे जगताप यांनी सांगितले. प्रतिदिन ९ हजार ५०० टन क्षमतेने पाच महिन्यांत गाळप पूर्ण होईल. शेतकऱ्यांनी पट्टा पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

एआय तंत्रज्ञानावर शेतकरी परिसंवाद -

सोमेश्वर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी ऊसपीक परिसंवादाचे आयोजन केले आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती खर्च कमी आणि उत्पादन वाढवण्याबाबत केव्हीके आणि व्हीएसआयचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पुरुषोत्तम जगताप यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Someshwar Sugar Factory Ready; Plans to Crush 1.4 Million Tons Cane.

Web Summary : Someshwar sugar factory is set for crushing season, targeting 1.4 million tons of sugarcane. The factory's 64th boiler ignition ceremony was held, with plans to use harvesters to address labor shortages and improve efficiency.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSugar factoryसाखर कारखाने