Video : विधेयक मागे घ्या, अन्यथा..! ट्रान्सजेंडर विधेयकावर देशभर वादाची चिन्हे; पुण्यात विरोधाची ठिणगी

By किरण शिंदे | Updated: March 19, 2026 18:42 IST2026-03-19T18:41:45+5:302026-03-19T18:42:12+5:30

- यावेळी या विधेयकातील तरतुदींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

pune news signs of controversy across the country over the transgender bill; sparks of protest in Pune | Video : विधेयक मागे घ्या, अन्यथा..! ट्रान्सजेंडर विधेयकावर देशभर वादाची चिन्हे; पुण्यात विरोधाची ठिणगी

Video : विधेयक मागे घ्या, अन्यथा..! ट्रान्सजेंडर विधेयकावर देशभर वादाची चिन्हे; पुण्यात विरोधाची ठिणगी

पुणे - केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक २०२६ विरोधात पुण्यात तृतीयपंथीय समुदाय आक्रमक झाला आहे. या विधेयकामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप करत, ते तात्काळ मागे घ्यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ट्रान्सजेंडर समुदायातील मोठ्या संख्येने व्यक्ती तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी या विधेयकातील तरतुदींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

समुदायाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या विधेयकातील प्रस्तावित दुरुस्त्यांमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. २०१९ च्या मूळ कायद्यात ट्रान्स पुरुष, ट्रान्स महिला आणि इंटरसेक्स व्यक्तींसह विविध सामाजिक-सांस्कृतिक ओळखींचा समावेश होता. मात्र नव्या दुरुस्तीत ही व्याख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.

विशेषतः, स्वतःची लिंग ओळख ठरवण्याचा अधिकार काढून घेऊन त्याऐवजी ‘वैद्यकीय मंडळाची’ शिफारस अनिवार्य करण्याचा प्रस्ताव अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “लिंग ओळख ही व्यक्तीच्या सन्मानाशी आणि स्वायत्ततेशी निगडीत बाब आहे. ती सरकार किंवा कोणत्याही संस्थेने ठरवण्याचा अधिकार नसावा,” असे ठाम मत उपस्थितांनी मांडले.

यावेळी केंद्र सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला की, हे विधेयक तातडीने मागे घेतले नाही, तर ट्रान्सजेंडर समुदाय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. तसेच, भविष्यात अशा संवेदनशील विषयांवर कायदे करताना संबंधित समुदायातील तज्ज्ञांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.

Web Title : ट्रांसजेंडर विधेयक का देशव्यापी विरोध; पुणे में विधेयक वापस लेने की चेतावनी।

Web Summary : पुणे में ट्रांसजेंडर समुदाय ने ट्रांसजेंडर व्यक्ति विधेयक का विरोध किया, अधिकारों के उल्लंघन का आरोप लगाया। उन्होंने विधेयक को तुरंत वापस लेने की मांग की, लिंग पहचान के लिए मेडिकल बोर्ड की मंजूरी का विरोध किया। अनुपालन में विफलता से व्यापक प्रदर्शन होंगे, कार्यकर्ताओं ने चेतावनी दी।

Web Title : Transgender bill faces nationwide opposition; Pune activists threaten protests if not withdrawn.

Web Summary : Pune's transgender community protests the Transgender Persons Bill, alleging it infringes on rights. They demand immediate withdrawal, opposing provisions requiring medical board approval for gender identity. Failure to comply will trigger widespread demonstrations, activists warn.