बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विविध राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असतानाच बारामतीत महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीतील ‘विद्या प्रतिष्ठान’मध्ये संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार तसेच संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.
या बैठकीत विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त विठ्ठल मणियार, किरण गुजर, डॉ. आर. एम. शहा, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव नीलिमा गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, सीए प्रीतम पहाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीदरम्यान शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात स्वतंत्रपणे बंदद्वार चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे एक तास ही बैठक सुरू होती.
या बैठकीनंतर जय पवार हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार झालेले स्थळ येथे पोहोचले. त्यांनी या ठिकाणी माथा टेकवत दर्शन घेतले, तसेच तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
दरम्यान, या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटी आणि बंदद्वार बैठकीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Web Summary : Amidst merger talks, Sharad Pawar, Parth, and Jay Pawar held a closed-door meeting at Vidya Pratishthan, Baramati. Following the meeting, Jay Pawar visited Ajit Pawar's memorial. The meeting's specific agenda remains undisclosed, fueling political speculation.
Web Summary : विलय की चर्चाओं के बीच, शरद पवार, पार्थ और जय पवार ने बारामती के विद्या प्रतिष्ठान में बंद कमरे में बैठक की। बैठक के बाद, जय पवार ने अजित पवार के स्मारक का दौरा किया। बैठक का विशिष्ट एजेंडा अज्ञात है, जिससे राजनीतिक अटकलें तेज हो गई हैं।