पुण्यात ’थाई स्पा’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; ५ तरुणींना रंगेहाथ पकडले

By किरण शिंदे | Updated: January 25, 2026 12:07 IST2026-01-25T12:04:43+5:302026-01-25T12:07:13+5:30

या कारवाईत पाच तरुणींना रंगेहाथ पकडण्यात आले असून मुख्य आरोपी मेहबूब खान लष्कर (वय २८, रा. आसाम) याला अटक करण्यात आली आहे.

pune news sex racket in the name of thai Spa in Pune; 5 young women caught red handed | पुण्यात ’थाई स्पा’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; ५ तरुणींना रंगेहाथ पकडले

पुण्यात ’थाई स्पा’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; ५ तरुणींना रंगेहाथ पकडले

पुणे - 'थाई स्पा’च्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विमान नगर येथील दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या गुलमोहर रेजन्सी इमारतीमधील सिग्नेचर थाई स्पा येथे सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. या कारवाईत पाच तरुणींना रंगेहाथ पकडण्यात आले असून मुख्य आरोपी मेहबूब खान लष्कर (वय २८, रा. आसाम) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्पा सेंटरमध्ये मसाजच्या आडून सेक्स रॅकेट सुरू असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून विमानतळ पोलिस ठाण्यात येत होत्या. त्यानुसार पोलिसांनी गुप्तपणे खातरजमा केली. खात्री पटताच शनिवारी सायंकाळी विमानतळ पोलिसांच्या पथकाने अचानक छापेमारी करत स्पा सेंटरवर धाड टाकली.

या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये पाच तरुणी वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. अधिक चौकशीत आरोपी मेहबूब खान याने या तरुणींना जास्त पैशांचे आमिष दाखवून स्पाच्या नावाखाली देहव्यापारात ढकलल्याचे निष्पन्न झाले. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतून आरोपी स्वतःची उपजीविका करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ३८,४७५ रोख रक्कम, स्वाइप मशीन, कंडोमची पाकिटे, कागदपत्रे व इतर साहित्य जप्त केले असून संबंधित तरुणींची सुटका करून त्यांना योग्य ती मदत देण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १४३ (३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. 

Web Title : पुणे: थाई स्पा में सेक्स रैकेट का भंडाफोड़, पांच युवतियां मुक्त

Web Summary : पुणे पुलिस ने थाई स्पा की आड़ में चल रहे सेक्स रैकेट का भंडाफोड़ किया, एक दलाल को गिरफ्तार किया और पैसे के लालच में फंसी पांच महिलाओं को बचाया। नकदी, कंडोम और स्वाइप मशीनें जब्त की गईं।

Web Title : Pune: Sex racket busted at Thai spa; five rescued.

Web Summary : Pune police exposed a sex racket operating under the guise of a Thai spa, arresting a pimp and rescuing five women lured with money. Cash, condoms, and swipe machines were seized.