शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सात केंद्रे, २६ उपकेंद्रे... पण कर्मचारी अपुरे; भोरमध्ये आरोग्य सेवेची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:30 IST

-  भाटघर धरण परिसरातील दुर्गम गावांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस धरणातून बोटीने (लॉन्चद्वारे) आरोग्य सेवा दिली जाते.

सूर्यकांत किंद्रे  

भोर : भोर तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे व २६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्यसेवा दिली जात असली तरी कर्मचारी कमतरतेमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ११९ पदे मंजूर असताना केवळ ७५ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ४४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अपेक्षित आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

तालुक्यात अंबवडे, हिडॉशी, भुतोंडे, जोगवडी, नेरे, नसरापूर आणि भोंगवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय भाटघर धरण परिसरातील दुर्गम गावांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस धरणातून बोटीने (लॉन्चद्वारे) आरोग्य सेवा दिली जाते.

तालुक्यात रायरी, कारी, शिरवली, निगुडघर, आपटी, पिसावरे, नाटंबी, शिंद, पसुरे, पांगरी, उत्रोली, वेळवंड, हणस, करंदी, किकवी, सारोळा, न्हावी, देगाव, कापूरहोळ, हातवे, जांभळी, केळवडे, शिवरे आणि कासुर्डी (गुमा.) अशी उपकेंद्रे आहेत. बहुतेक ठिकाणी चांगल्या इमारती असल्या तरी कर्मचारी अपुरे असल्याने अनेक उपकेंद्रांमध्ये आठवड्यातून केवळ दोन दिवस आरोग्य सेवा दिली जाते. या ठिकाणी प्रामुख्याने किरकोळ औषधोपचार केले जातात, रुग्णांना दाखल करून उपचार करण्याची सुविधा नाही.काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नियमित येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे आरोग्य सेविकाच रुग्णांवर प्राथमिक उपचार करत असल्याचे चित्र आहे.    

अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असून दर महिन्याच्या ५ तारखेला डोळ्यांची तपासणी शिबिरे घेतली जातात. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया नामांकित रुग्णालयात करण्यात येतात. सर्पदंश व कुत्र्याच्या चावण्यावरील लसी उपलब्ध आहेत. मात्र या ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून औषध निर्माण अधिकारी पद रिक्त असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, हिवताप, डेंग्यू, टायफॉईड, कर्करोग, यकृत व हृदयविकार तपासण्या तसेच गरोदर महिलांची तपासणी केली जाते. लसीकरण, प्रसूती सेवा आणि रात्रीची आपत्कालीन सेवा उपलब्ध असली तरी गंभीर रुग्णांना दाखल करून उपचार करण्याची सुविधा मर्यादित आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याची तक्रार आहे. भांबटमाळ उपकेंद्राची सेवा पुन्हा सुरू

मागील तीन-चार वर्षांपासून बंद असलेले भांबटमाळ येथील आरोग्य उपकेंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे आठवड्यातून दोन दिवस वैद्यकीय अधिकारी येथे येऊन रुग्णांना सेवा देतात. मात्र ही सेवा केवळ प्राथमिक औषधोपचारापुरती मर्यादित असल्याच माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबाजी साळेकर यांनी दिली.

कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्याची मागणी

कारी परिसरातील पाच ते सात हजार नागरिकांसाठी असलेल्या आरोग्य उपकेंद्रात कर्मचारी अपुरे असल्याने मुक्कामी सेवा मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी रणधीन जेथे यांनी केली.

 नेरे येथे मॉडेल आरोग्य केंद्र

तेरे येथे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमांतर्गत सुधारणा करण्यात येत असून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व डिलिव्हरी रूमचे काम पूर्णत्वास आले आहे. तालुक्यातील २६ उपकेंद्रांपैकी २३ उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत, तर करंदी उपकेंद्रातील पद रिक्त आहे.

भांबटमाळ उपकेंद्राची सेवा पुन्हा सुरू

मागील तीन-चार वर्षांपासून बंद असलेले भांबटमाळ येथील आरोग्य उपकेंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आठवड्यातून दोन दिवस वैद्यकीय अधिकारी येथे येऊन रुग्णांना सेवा देतात. मात्र ही सेवा केवळ प्राथमिक औषधोपचारापुरती मर्यादित असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबाजी साळेकर यांनी दिली.

कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्याची मागणी

कारी परिसरातील पाच ते सात हजार नागरिकांसाठी असलेल्या आरोग्य उपकेंद्रात कर्मचारी अपुरे असल्याने मुक्कामी सेवा मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी रणधीर जेथे यांनी केली.

भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये रिक्त असलेल्या  पदांबाबत जिल्हा परिषदेकडे मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही पदे भरली जातील.- डॉ. अभय तिडके, तालुका आरोग्य अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Bhor Health Services Strained: Staff Shortages Impact Rural Care

Web Summary : Bhor's health system struggles with staff shortages despite seven primary centers and 26 sub-centers. Forty-four posts are vacant, hindering rural healthcare access. Some sub-centers offer limited services, impacting treatment availability and forcing reliance on private options. Authorities seek to fill vacancies.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र