शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातही धावणार ‘राजमाता जिजाऊ बस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:11 IST

 -एसटी प्रशासनाकडून महामंडळाकडे २५० बसची मागणी, पहिल्या टप्प्यात १०० बस दाखल होणार

पुणे :पुणे विभागात नव्याने सुरू झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस सेवेचा विस्तार करण्यासाठी पुणे एसटी विभागाकडून राज्य परिवहन महामंडळाकडे २५० बसची मागणी करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात १०० बस एप्रिलअखेर येण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण-शहरी भागातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित होणार आहे. या बसमुळे प्रवाशांना आणखी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.

पुणे विभागात एक आठवड्यापूर्वी ‘राजमाता जिजाऊ’ शटल सेवेची सुरुवात झाली आहे. या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. यामुळे शटल सेवेचा विस्तार करण्यासाठी पुणे विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडे २५० बसची मागणी केली आहे. या बस टप्प्याटप्प्याने दाखल होण्याची शक्यता आहे. या बसमुळे ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना फायद्याचे ठरणार आहे. सध्या बारामती ते स्वारगेट या मार्गावर ही बस धावत आहे. विशेष म्हणजे, ‘राजमाता जिजाऊ’ बस महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरदार महिला, विद्यार्थिनी, तसेच दैनंदिन प्रवाशांसाठी ही सेवा अधिक उपयुक्त ठरणार आहे. सकाळी आणि सायंकाळी पीक अवर्समध्ये या बस धावणार असल्याने कामानिमित्त शहरात ये-जा करणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

---------

एसटी वाहतूक व्यवस्थेला बळ :

एसटी महामंडळाकडून यापूर्वी शिवनेरी, शिवाई यांसारख्या प्रीमियम सेवा सुरू केल्या असल्या तरी, सामान्य प्रवाशांसाठी परवडणारी आणि आधुनिक सुविधा असलेली शटल सेवा ही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. त्यामुळे या २५० बसमुळे प्रवाशांना कमी दरात प्रवास करता येणार आहे. या नव्या बसमुळे पुणे विभागातील एसटी वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

----------

‘राजमाता जिजाऊ’ बसची वैशिष्ट्ये :

-आसन क्षमता : ५६ प्रवासी (सध्याच्या बसपेक्षा १६ जागा अधिक)

-सुरक्षा : ५ सीसीटीव्ही कॅमेरे

-जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली

-पॅनिक बटण सुविधा

-पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम

-इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक

-या बस मुख्यतः सकाळी व सायंकाळी पीक अवर्समध्ये नोकरदार महिला व विद्यार्थिनींसाठी चालविण्यात येणार आहेत.

-----------

‘शटल सेवा’ ठरणार गेमचेंजर :

-ग्रामीण भागातून पुण्यात जलद प्रवास

-वेळेची मोठी बचत

-कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय

-सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ

-एसटीच्या पारंपरिक सेवेला आधुनिकतेची जोड

----------

या मार्गावर धावणार शटल बस :

-स्वारगेट ते बारामती

-स्वारगेट ते भाेर

-वाकडेवाडी ते भीमाशंकर

-मंचर ते भीमाशंकर

-बारामती ते नीरा

-बारामती ते भिगवण

-इंदापूर ते बारामती

-इंदापूर ते अकलूज

-शिरूर ते चाैफुला

-शिरूर ते आळेफाटा

-राजगुरूनगर ते पाबळ

-जुन्नर ते ओतूर

-जुन्नर ते पुणे 

एसटी महामंडळाकडे २५० बसची मागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पुढील एक महिन्यात १०० बस दाखल होण्याची शक्यता आहे. या बसमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. ज्या ज्या मार्गावर बस चालवायचे याचे नियोजन करण्यात आले आहे. - कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajmata Jijau Bus Service Expands to Remote Areas in Pune District

Web Summary : Pune ST requests 250 Rajmata Jijau buses to expand rural connectivity. First 100 buses expected soon, enhancing travel with modern amenities and prioritizing women's safety on key routes.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWomenमहिला