पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ जानेवारीपासून रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:24 IST2025-12-16T17:23:53+5:302025-12-16T17:24:50+5:30

- चित्रपट महोत्सवाची सुरुवात ' ला ग्राझिया' (इटली) या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शित चित्रपटाने होणार

pune news pune International Film Festival to be held from January 15 | पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ जानेवारीपासून रंगणार

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ जानेवारीपासून रंगणार

पुणे : जगातील विविध देशांमधील दर्जेदार चित्रपटांची पर्वणी देणा -या २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बिगुल वाजले असून, पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या वतीने येत्या १५ ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान महोत्सव रंगणार आहे.

यंदा चित्रपट महोत्सवाची संकल्पना 'महान दिग्दर्शक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्म शताब्दी', अशी आहे. जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि ग्लोबल सिनेमा अशा विविध विभागांमध्ये सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहिती पिफ'चे संचालक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली . यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबिना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) यावेळी उपस्थित होते.

चित्रपट महोत्सवाची सुरुवात ' ला ग्राझिया' (इटली) या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शित चित्रपटाने होणार असून, महोत्सवाचा शेवट 'फादर मदर सिस्टर ब्रदर' (अमेरिका, आर्यलंड, फ्रान्स) या जीम जारमुश दिग्दर्शित चित्रपटाने होणार आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात १०३ देशांमधील ९०० हून अधिक चित्रपट आले होते. त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत या चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून, सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपटास 'महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (१० लाख रुपये) दिला जाणार आहे.

पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल (६ स्क्रीन), ई-स्क्वेअर युनिव्हर्सिटी रोड (३ स्क्रीन) आणि एनएफडीसी-एनएफआय- लॉ कॉलेज रोड (१ स्क्रीन) अशा १० स्क्रीनमध्ये हा महोत्सव होणार आहे. महोत्सवासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. स्पॉट रजिस्ट्रेशन ५ जानेवारीपासून सर्व थिएटर्समध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ सुरू होणार आहे. 

जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात निवडण्यात आलेल्या १४ चित्रपटांची यादी

अ सेंड अॅन्ड ब्युटिफुल वर्ल्ड लेबनन (अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया, कतार) , ऍडम'स सेक बेल्जियम(फ्रान्स) ऑल वॅटस् लेफ्ट ऑफ यू - (जर्मनी), अॅज वुई ब्रेथ ( तुर्की,) डेनमार्क दिग्दर्शक सेयहमस अलतून, ब्ल्यू हॅरॉन (कॅनडा), लॉस्ट लँड (जपान), मिल्क टीथ ( रोमानिया), निनो( फ्रान्स ), रीबिल्डिंग (अमेरिका), सायलेंट फ्रेंड( जर्मनी), स्पाईंग स्टार्स ( फ्रान्स), द एलिसियन फील्ड (भारत), धिस इज माय नाईट ( सिरिया), व्हाईट स्नेल (ऑस्ट्रिया)

Web Title : पुणे अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव 15 जनवरी से शुरू होगा।

Web Summary : गुरु दत्त को समर्पित 24वां पुणे अंतर्राष्ट्रीय फिल्म महोत्सव 140 फिल्मों का प्रदर्शन करेगा। इसकी शुरुआत 'ला ग्राज़िया' से होगी और समापन 'फादर मदर सिस्टर ब्रदर' से। वैश्विक प्रतिस्पर्धा के लिए 14 फिल्में चुनी गई हैं, विजेता को ₹10 लाख का पुरस्कार मिलेगा। ऑनलाइन पंजीकरण शुरू हो गया है।

Web Title : Pune International Film Festival to commence from January 15th.

Web Summary : The 24th Pune International Film Festival, celebrating Guru Dutt, will showcase 140 films across various sections. It begins with 'La Grazia' and concludes with 'Father Mother Sister Brother'. 14 films are selected for the global competition, with the winner receiving a ₹10 lakh award. Registration is open online.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.