शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सातारा महामार्गावर खासगी व्हॉल्वो बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:34 IST

कोल्हापूरवरून पुण्याकडे भरधाव वेगाने येणारी बस शिंदेवाडी पुलाजवळ आली असताना इंजिन भागातून धुर निघू लागला.

पुणे -  पुणे सातारा  महामार्गावर वेळू तालुका भोर या गावचे हद्दीमध्ये एका खाजगी ट्रॅव्हल्स बसला दुपारी साडेबाराच्या सुमारासअचानक आग लागली. वाहन चालकाने प्रसंग अवधान दाखवून बस महामार्गावरती रस्त्याच्या कडेला घेऊन तात्काळ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार कोंडुस्कर या ट्रॅव्हल्स कंपनीची वोल्वो बस कोल्हापूर कडून पुण्याच्या दिशेने जात होती. अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला. 

 

 

आगीच्या घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम डब्ल्यूओएम कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्या कारणाने आग आटोक्यात येत नव्हती त्याच बरोबर आगीमध्ये जळत असलेल्या बसमध्ये स्फोट होत असल्याकारणाने आग आटोक्यात येण्यास उशीर झाला तोपर्यंत बस  खाक झाली होती.

या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या सामानासह बसमधील सर्व वस्तू जळून गेल्या आहेत. आगीच्या कारणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा कयास वर्तवला जात आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती,या घटनेनंतर पुन्हा एकदा खेडशिवापूर परिसरामध्ये अग्निशमन दलाचे केंद्र असावं या मागणीला जोर येऊ लागला आहे गेले अनेक वर्षांमध्ये या भागामध्ये अनेक मोठ्या आग लागण्याच्या घटना घडल्या असल्याने अग्निशमन दलाचे या भागामध्ये केंद्र सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगFire Brigadeअग्निशमन दल