शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत राज्यात पाच ठिकाणी खासगी दस्त नोंदणी कार्यालये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:47 IST

या खासगी कार्यालयांतून दस्त नोंदणी करण्यासाठी सुमारे सव्वापाच हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

पुणे : राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यांत पाच ठिकाणी अशी खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार असून, त्यात मुंबईत दोन, तर पुणे, ठाणे व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी एक कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यांत २५ ठिकाणी अशी कार्यालये सुरू होतील. या खासगी कार्यालयांतून दस्त नोंदणी करण्यासाठी सुमारे सव्वापाच हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी, अपुऱ्या सुविधा आणि वेळेचा अपव्यय या बाबी लक्षात घेऊन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने ६० ठिकाणी अशी कार्यालये सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यानुसार ‘व्हीएफएस ग्लोबल’ या कंपनीने यात स्वारस्य दाखविले. या कंपनीला ६० कार्यालये सुरू करण्यास कार्यारंभ आदेश दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात मुंबईत दोन, तर पुणे ठाणे व नागपूर येथे प्रत्येकी एक खासगी कार्यालये सुरू होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात त्यानंतरच्या तीन महिन्यांत राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ठिकाणी प्रत्येकी चार, तर नाशिक, नागपूर व संभाजीनगर येथे प्रत्येकी तीन अशी एकूण २५ कार्यालये सुरू होतील.

तिसऱ्या टप्प्यात एकूण ३० कार्यालये सुरू होतील. त्यात अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक कार्यालय होईल.

या कार्यालयांत सरकारी दुय्यम निबंधक व एक वरिष्ठ लिपिक वगळता अन्य सर्व कर्मचारी संबंधित कंपनीचे असतील. या कंपनीला कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सोफासेट, वातानुकूलित यंत्रणा, स्वच्छतागृहाची सोय, तसेच नोंदणीला वेळ लागणार असल्यास चहा, कॉफीची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. यासाठी नागरिकांना सेवाशुल्क द्यावे लागेल. प्रत्येक दस्तासाठी ५ हजार २१७ रुपये ९६ पैसे भरावे लागणार आहेत. हे शुल्क कंपनी स्वतःकडे ठेवणार असून, दस्त नोंदणीसाठी लागणारे नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्क मात्र राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे. 

निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर संबंधित कंपनीला येत्या सहा महिन्यांत पाच कार्यालये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतरच्या तीन महिन्यांत आणखी २५ कार्यालये सुरू होतील.  - अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे 

English
हिंदी सारांश
Web Title : Private Document Registration Offices to Open in Maharashtra Within Six Months

Web Summary : Maharashtra will soon have private document registration offices. Initially, five offices will open in Mumbai, Pune, Thane, and Nagpur within six months. An additional fee of approximately ₹5,217 will be charged for registration services at these private offices. This aims to reduce crowding and improve efficiency.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे