१० तास शर्थीचे प्रयत्न! अखेर गरोदर गोमातेची सुटका; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 18:12 IST2025-05-25T18:11:25+5:302025-05-25T18:12:31+5:30

या सर्व कामगिरीकरिता जवळपास दहा तासांचा अवधी लागला. गाय बाहेर येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

pune news Pregnant cow finally rescued after ten hours In a slum on Tadiwala Road | १० तास शर्थीचे प्रयत्न! अखेर गरोदर गोमातेची सुटका; व्हिडिओ व्हायरल

१० तास शर्थीचे प्रयत्न! अखेर गरोदर गोमातेची सुटका; व्हिडिओ व्हायरल

- शगुफ्ता शेख

पुणे -
आज पहाटे सहाच्या सुमारास ताडीवाला रोड येथील झोपडपट्टीत एका अरुंद गल्लीमध्ये आठ महिन्यांची गरोदर असलेली गाय अडकलेल्या अवस्थेत असताना अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. 

दलाच्या जवानांनी सेफ्टी बेल्ट, रश्शी, पुली अशा विविध उपकरणांच्या साह्याने अडकलेल्या गायीला बाहेर काढण्यास सुरुवात केली असता एल आकार अरुंद गल्लीमुळे (दिड ते दोन फुट) मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. पुली लावून गायीचे अडकलेले पाय बाहेर काढून उभे करण्याचा प्रयत्न केला. जवळपास सर्व प्रकारे प्रयत्न करीत असताना मदतीकरिता वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम दाखल झाली. त्याचवेळी त्यांनी ही विविध उपकरणे वापरत सुटकेचे प्रयत्न केले.

शेवटी गल्लीमधील रहिवाशांच्या घराबाहेरील चार जीने व कट्टे काढून हळुवारपणे गायीला बाहेर काढण्यात यश आले. या सर्व कामगिरीकरिता जवळपास दहा तासांचा अवधी लागला. गाय बाहेर येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी वरिष्ठ अग्निशमन अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल, वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम, अँब्युलंस, पोलीस विभाग, ढोले पाटील क्षेञिय कार्यालय, स्थानिक नागरिक या सर्व यंञणांनी सहभाग घेत कामगिरी यशस्वीरित्या पुर्ण केली.

Web Title: pune news Pregnant cow finally rescued after ten hours In a slum on Tadiwala Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.