१ जूनपासून पीएमपी तिकीट दरवाढ; दर सेटचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:58 IST2025-05-24T15:58:14+5:302025-05-24T15:58:49+5:30

- संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिकीट दरवाढीचा ठराव पास : अनेक वर्षांपासून तिकिट दरात झाली नव्हती वाढ  

pune news PMP ticket price hike from June 1 work on rate set begins | १ जूनपासून पीएमपी तिकीट दरवाढ; दर सेटचे काम सुरू

१ जूनपासून पीएमपी तिकीट दरवाढ; दर सेटचे काम सुरू

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिकीट दरवाढीचा ठराव पास केला होता. त्यानंतर, नवीन स्टेजनुसार मशिनमध्ये तिकीट दर सेट करणे आणि इतर तांत्रिक बाबीचे काम पीएमपीकडून सुरू करण्यात आले असून, (दि. १) जूनपासून पीएमपीकडून नव्या स्टेजनुसार तिकीट आकारले जाणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवाशांसाठी बससेवा पुरविण्यात येते. राज्य शासनाच्या २० डिसेंबर २००५ रोजीच्या पत्रास अनुसरून पुणे परिवहन महामंडळाने २० डिसेंबर २०१४ पासून प्रवासी तिकीट दरवाढ केली होती. यामध्ये १ ते ७८ किलोमीटरसाठी २ किमीच्या अंतराने १ ते ४० पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी करण्यात येत होते. आता त्यात बदल करून ११ स्टेज करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेज कमी झाले आहेत. त्यानुसार, तिकीट दर सेट करणे व इतर तांत्रिक बाबी करण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आहे.

बस संचलनामध्ये सोयीच्या दृष्टीने सुसूत्रता होण्यासाठी १ ते ३० किमी अंतरासाठी ५ किमीच्या अंतराने ६ स्टेज व त्यापुढे ३० ते ८० किमी अंतरासाठी १० किमीच्या अंतराने ५ स्टेज असे एकूण ११ स्टेज रचनेत किलोमीटर आधारित सहरचना करण्यात आली आहे. पुढील तांत्रिक बाबी पूर्ण करून नवे दर लागू करण्यात येणार आहे. 

उत्पन्न वाढणार पुणे महानगर परिवहन

महामंडळाकडून पुणे, पिंपरी आणि पीएमआरडीच्या हद्दीत दैनंदिन १ हजार ६०० बसमधून प्रवासी सेवा देण्यात येते. यातून जवळपास दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न पीएमपीला मिळते. आता तिकीट दरवाढ लागू केल्यानंतर पीएमपीचे उत्पन्न आपोआप वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीला दैनंदिन ३० ते ४० टक्के उत्पन्नात वाढ होणार आहे.

Web Title: pune news PMP ticket price hike from June 1 work on rate set begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.