Hydrogen Bus: पुण्यात पीएमपीचा प्रवास आता हायड्रोजनच्या दिशेने होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:10 IST2025-10-16T15:09:32+5:302025-10-16T15:10:15+5:30
Pune Hydrogen Bus: शहरात हायड्रोजन बस दाखल; एक आठवडा आयडीटीआर संस्थेतर्फे शहरातील विविध भागात चाचणी होणार

Hydrogen Bus: पुण्यात पीएमपीचा प्रवास आता हायड्रोजनच्या दिशेने होणार
Pune Hydrogen Bus: पीएमपीचा प्रवास आता हायड्रोजनच्या दिशेने होणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) येथे आयओसीएल, टाटाची हायड्रोजन बस दाखल झाले असून, पुढील एक आठवडा इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) संस्थेतर्फे त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर याबद्दल निर्णय होणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
पुण्यात वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेता, हायड्रोजन बस फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने पर्यायी वाहनांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी मेडाची मदत घेण्यात आली असून, बुधवारी एक हायड्रोजन बस दाखल झाली आहे.
या बसचा पुढील एक आठवडा शहरातील विविध भागात चाचणी होणार आहे. ही चाचणी इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (आयडीटीआर) संस्थेतर्फे घेण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. हायड्रोजन बस हे प्रदूषणरहित नामले जाते. परिणामी वातावरणात कार्बन उत्सर्जन होत नाही. यामुळे शहराच्या प्रदूषणावर होणार परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे.
हायड्रोजन बस दाखल झाले असून, पुढील एक आठवडा चाचणी होणार आहे. यशस्वी चाचणी झाल्यानंतर बस खरेदीचा निर्णय होणार आहे. शहरातील विविध भागात चाचणी घेण्यात येणार आहे. - पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी