शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
3
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
4
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
5
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
6
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
7
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
8
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
10
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
11
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
12
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
13
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
14
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
15
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
16
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
17
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
18
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
19
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
20
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी आर्थिक अडचणीत;निर्यातीत घट 

By अजित घस्ते | Updated: December 7, 2025 14:30 IST

एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.

पुणे : कांदा निर्यातीत घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या दर कोसळल्यामुळे मार्केट यार्ड गुलटेकडी कांदा विभागात दररोज ७० ते ८० ट्रक आवक होत आहे. किलोला केवळ ८ ते १४ रुपये भाव मिळत आहे. उत्पादनाच्या २५ टक्के जादा कांद्याची बाजारात साठवणूक झाल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कांद्याचा लागवडीचा हंगाम हा १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी असतो. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवत आहे. कांदा बियाणांचे दर प्रतिकिलो २५०० ते ३००० रुपये आहेत. एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.

पावसाचा फटका

अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी खरीप आणि लेट खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकविलेला कांदा मातीमोल झाला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर परिसरातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले आहे.

कांद्याच्या भावात घसरण

सध्या कांद्याचे दर कमी असून, काढणीनंतर जेव्हा कांदा विक्रीसाठी बाजारात येतो, तेव्हा अनेक वेळा बाजारभावात खूप घसरण होते. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. यापूर्वी काही ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी ४० रुपये किलो असलेला कांद्याचा दर सध्या ८ ते १४ रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

निर्यातीच्या धोरणामुळे नुकसान

निर्यातीतील अनिश्चित धोरणांमुळे आणि निर्यातबंदीमुळेही कांद्याचे भाव घसरले आहेत. ज्यामुळे साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा आणि येणाऱ्या नवीन कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

सध्या बाजारात खेड, जुन्नर, आंबेगाव, कोपरगाव या भागांतून कांद्याची मार्केट यार्डमध्ये आवक होत आहे. दररोज ८० ट्रकची आवक होत आहे. मात्र, भाव पडले आहेत. सध्या केवळ ८ ते १४ रुपये प्रतिकिलो कांद्याला भाव मिळत आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे कांदा साठवणूक मोठी झाली आहे. त्यात नवीन कांद्याची आवकही सुरू आहे. आणखीन ३ महिने तरी कांद्याच्या भावात दरवाढ होणार नाही.  - अप्पा कोरपे, कांदा व्यापारी

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Price Crash: Farmers in Crisis; Export Decline

Web Summary : Onion prices have plummeted due to reduced exports and oversupply, leaving farmers struggling. Excess rainfall damaged crops, further impacting yields. Farmers face losses as prices fall to ₹8-14 per kg. Unstable export policies exacerbate the situation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र