शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 12:31 IST

- दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त

पुणे : महागाईच्या झळा सामान्यांना बसत असून, दुधाच्या दरातही दोन रुपयांनी वाढ झाली आहे. सामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. यामुळे कडक उन्हाळ्यात प्रतिलिटर गायीच्या दुधाला ५८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७४ रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे सामान्यांना याची झळ सोसावी लागत आहे. यामुळे ग्राहकांच्याकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे, तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत.दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीत पार पडली. या बैठकीत दूध दरवाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक संघाकडून गाय आणि म्हैस या दोन्हींच्या दूध दरात दोन रुपये प्रतिलिटर इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पूर्वीचे दर - वाढीव दरगायीचे दूध - ५४ ते ५६ - ५६ ते ५८म्हशीचे दूध - ७० ते ७२ - ७२ ते ७४

उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली. तसेच पनीरमधील भेसळ आणि शेतकऱ्यांचे थकीत अनुदान लवकर मिळण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकासमंत्री आणि आयुक्त यांची भेट घेणार आहे. - प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघजीवनावश्यक वस्तूमध्ये दूध येते. रोजच्या वापरातील आणि लहान मुलांना उपयुक्त असणारे दूध किमती वाढतच आहे. त्यामुळे सरकारने दूध वाढविणाऱ्या संघ सोसायटीवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. दूध महाग झाले तरी घ्यावे लागते. यामुळे दुधाचे दर नियंत्रणात असावेत. - मंगल मोहिते, गृहिणीदुधाच्या दरात वारंवार वाढ होत आहे. मात्र, उन्हाळ्याच्या तडाख्यात फ्रीजमध्ये दूध ठेवणे आणि लाईट बिल यातून दूध विक्री परवडत नाही. त्यात एक रुपयांचं मिळत असल्याने दुधापेक्षा वीज बिल जादा येत आहे. - रेखा खोसे, दुकानदार

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmilkदूधMilk Supplyदूध पुरवठा