शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

Property Tax : उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांना नोटीस- अतिरिक्त आयुक्तांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 20:48 IST

मिळकत कर विभाग महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला विभाग आहे.

- हिरा सरवदेपुणे: मिळकत कर वसुलीसाठी नेमलेल्या पथकातील २३ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ १९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, त्यामुळे त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे.

मिळकत कर विभाग महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला विभाग आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत करातून २ हजार ७०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित पकडले होते. आतापर्यंत बावीसशे कोटी मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १० दिवस उरले आहेत. एवढ्या कमी कालावधीत मिळकत कराचे उद्दिष्ट गाठणे कठीण आहे. सुमारे ४०० कोटींची तूट या विभागाच्या उत्पन्नात होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मिळकत कर विभागाचे सर्व्हर सातत्याने डाऊन असते.

दरम्यान, मिळकत कराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर आकारणी आणि संकलन विभागाने कर्मचा-यांना दररोज दहा मिळकतधारकांकडून कर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच, मार्चअखेरपर्यंत त्यांच्या सुट्यांही रद्द करण्यात केल्या आहेत. कर वसुलीसाठी महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दामिनी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दामिनी पथकांची कामगिरी चांगली असताना पुरुष कमर्चारी मात्र उद्दिष्ट पूर्ण करत नसल्याचे समोर आले आहे. वसुली पथकातील २३ कर्मचाऱ्यांनी केवळ १९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर