Property Tax : उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांना नोटीस- अतिरिक्त आयुक्तांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 20:48 IST2025-03-21T20:47:52+5:302025-03-21T20:48:30+5:30

मिळकत कर विभाग महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला विभाग आहे.

pune news Notice to those who do not meet the target Information from Additional Commissioners | Property Tax : उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांना नोटीस- अतिरिक्त आयुक्तांची माहिती 

Property Tax : उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्यांना नोटीस- अतिरिक्त आयुक्तांची माहिती 

- हिरा सरवदे

पुणे
: मिळकत कर वसुलीसाठी नेमलेल्या पथकातील २३ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ १९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, त्यामुळे त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे.

मिळकत कर विभाग महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेला विभाग आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकामध्ये मिळकत करातून २ हजार ७०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित पकडले होते. आतापर्यंत बावीसशे कोटी मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १० दिवस उरले आहेत. एवढ्या कमी कालावधीत मिळकत कराचे उद्दिष्ट गाठणे कठीण आहे. सुमारे ४०० कोटींची तूट या विभागाच्या उत्पन्नात होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मिळकत कर विभागाचे सर्व्हर सातत्याने डाऊन असते.

दरम्यान, मिळकत कराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर आकारणी आणि संकलन विभागाने कर्मचा-यांना दररोज दहा मिळकतधारकांकडून कर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच, मार्चअखेरपर्यंत त्यांच्या सुट्यांही रद्द करण्यात केल्या आहेत. कर वसुलीसाठी महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या दामिनी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दामिनी पथकांची कामगिरी चांगली असताना पुरुष कमर्चारी मात्र उद्दिष्ट पूर्ण करत नसल्याचे समोर आले आहे. वसुली पथकातील २३ कर्मचाऱ्यांनी केवळ १९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

Web Title: pune news Notice to those who do not meet the target Information from Additional Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.