यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:54 IST2025-12-16T17:52:43+5:302025-12-16T17:54:09+5:30
जर खुलासा समाधानकारक न वाटला किंवा आपण सुनावणीस गैरहजर राहिलात, तर आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना नोटीस
आव्हाळवाडी : गेल्या १३ वर्षांपासून आर्थिक अनियमिततेमुळे बंद असलेल्या हवेली तालुक्यातील थेऊर येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना व प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग नीलिमा गायकवाड यांच्याकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध विकास लवांडे व अन्य दोन सभासदांनी केल्या तक्रारी संदर्भात खुलासा करण्यासाठी २४ डिसेंबर रोजी सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी ही नोटीस दिली गेली आहे.
नोटीसमध्ये प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी नमूद केले आहे की, तक्रार अर्जदार विकास लवांडे व इतरांनी आपल्या तक्रार अर्जात मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. या मुद्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः समोर हजर राहून खुलासा करावा.
जर खुलासा समाधानकारक न वाटला किंवा आपण सुनावणीस गैरहजर राहिलात, तर आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. कैलास जरे (कार्यकारी संचालक, श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर) यांनी याबाबत सांगितले की, ही बाब प्रशासकीय असून याबाबत योग्य ते खुलासा केला जाईल. ते फार काही बोलणार नाहीत.