शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ई-वाहनांवर कर नाही, तरीही नोटिसा; आरटीओची चूक उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:58 IST

- प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एसएमएसद्वारे थकीत कर भरण्याबाबत विविध वाहनधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या.

पुणे : राज्य शासनाने ३१ मार्च २०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करातून संपूर्ण सूट दिली असतानाही पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) अशा वाहनधारकांनाही थकीत कराच्या नोटिसा पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे.या चुकीमुळे वाहन मालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, संबंधित नोटिसा अखेर रद्द करण्यात आल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एसएमएसद्वारे थकीत कर भरण्याबाबत विविध वाहनधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश झाल्याने अनेक वाहन मालक गोंधळात पडले. काहींनी याबाबत थेट आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधत चौकशी केली. दरम्यान, महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण २०२५ अंतर्गत २३ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील नोंदणीकृत सर्व इलेक्ट्रिक वाहनांना ३१ मार्च २०३० पर्यंत मोटार वाहन करातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांनी कोणताही थकीत कर भरण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.आरटीओकडून पाठविण्यात आलेल्या या नोटिसा तांत्रिक कारणामुळे गेल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य पातळीवरील ऑनलाइन प्रणालीमध्ये आवश्यक बदल न झाल्यामुळे ही चूक घडल्याचे प्रशासनाने नमूद केले. संबंधित नोटिसा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहने वगळता, इतर सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांचा थकीत कर तत्काळ भरावा, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : RTO mistakenly sends tax notices to electric vehicle owners despite exemption.

Web Summary : Pune RTO wrongly issued tax notices to electric vehicle owners, despite state exemption till 2030. The RTO attributed this to a technical error and is rescinding the notices. Other vehicle owners must pay dues promptly.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे