शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pune News : एकतानगरीच्या कामासाठी पालिका निविदा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:16 IST

- वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प करणार

पुणे : एकतानगर, विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती व वस्ती यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटींचा निधी राज्य सरकार देईल, या भरवाशावर पुणे महापालिका या कामासाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यानुसार या कामासाठी निविदा काढली जाणार आहे.

शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे २५ जुलै २०२४ रोजी एकतानगर भागात अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे येथील सदनिका आणि दुकाने यांचे विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे.

त्यासाठीचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असून सोबतच या भागासाठी ३०० कोटींचा आपत्ती निवारण निधी द्यावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे २६ जून २०२५ रोजी पाठविला आहे. त्यात पुणे महापालिका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत आहे. त्याअंतर्गत ११ टप्प्यांपैकी मुठा नदीवर विषयांकित भागाचा समावेश असलेला वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागाचा स्ट्रेच-६ सुमारे ४.१० कि.मी. लांबीचा समावेश आहे.

पूर्वगणन पत्रकाला मंजुरी, आता निविदा

एकतानगर, विठ्ठलनगर व निंबजनगर या भागातील इमारती व वस्त्यांचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागातील नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींच्या पूर्वगणन पत्रकाला पूर्वगणना समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच निविदा काढली जाणार आहे.

२०२६ जूनपर्यंत काम पूर्ण

नदी सुधार प्रकल्पाच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट पुराच्या पाण्यापासून लगतच्या वस्ती व भागाचे संरक्षण करणे हा आहे. यामध्ये पथ-वे व जॉगिंग ट्रॅक करणे, वृक्ष लावणे, घाट विकसित करणे आदींचा समावेश आहे.

एकतानगर विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती अन् वस्त्यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल भागातील मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी निधी द्यावा, असे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नमूद केले होते; अद्यापही सरकारकडून या कामासाठी पैसे आलेले नाही. त्यामुळे सरकार या कामासाठी पैसे देईल या भरवशावर महापालिका या कामासाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यानुसार या कामासाठी निविदा काढली जाणार आहे.. त्यामुळे २०२६ च्या जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊ शकेल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Corporation to Tender for Ektanagar River Restoration Work

Web Summary : Pune Municipal Corporation will initiate the tendering process for the Ektanagar river restoration project, relying on the state government's promise of ₹300 crore disaster management funds. The project aims to protect Ektanagar, Vitthalnagar, and Nimbajnagar from floods and is expected to be completed by June 2026.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेElectionनिवडणूक 2024