खेडशिवापूर : अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामधील युद्धाचा परिणाम आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. कमर्शियल गॅस पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला तुटवडा यामुळे शिवगंगा खोऱ्यातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. गॅसअभावी व्यवसाय थांबवण्याऐवजी अनेक व्यावसायिकांनी आता पारंपरिक 'चुली' वर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
शिवगंगा खोऱ्यातील खेड-शिवापूर, नसरापूर आणि आसपासच्या परिसरात हॉटेल व्यवसायाची मोठी रेलचेल आहे. मात्र, अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने तसेच कमर्शियल गॅस सिलिंडर मिळणे बंद झाल्याने, हॉटेलमालकांनी आता आपल्या किचनमध्ये चुली मांडल्या आहेत.
एकीकडे सिलिंडरचा तुटवडा ही समस्या असली, तरी दुसरीकडे ''चुलीवरचे जेवण'' ही ग्राहकांसाठी पर्वणी ठरत आहे. गॅस उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव सुरू केलेला हा पर्याय आता ग्राहकांना आकर्षित करत आहे. चुलीवरच्या मटण रस्सा, भाकरी आणि पिठलं-भाकरीला पर्यटकांकडून मोठी मागणी मिळत असल्याचे हॉटेलचालकांनी सांगितले. गॅसअभावी हॉटेल बंद ठेवणे शक्य नाही, म्हणून आम्ही पुन्हा चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. यामुळे कष्ट वाढले असले, तरी ग्राहकांना चुलीवरच्या अन्नाची चव आवडत आहे.
सिलिंडरच्या तुटवड्यामुळे केवळ हॉटेल व्यावसायिकच नव्हे, तर खानावळी चालवणारे आणि छोटे टपरीचालकही त्रस्त आहेत. शासनाने आणि संबंधित गॅस कंपन्यांनी या तुटवड्यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी शिवगंगा खोऱ्यातील व्यापारी वर्गातून होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर अनेक छोट्या व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. - सत्यवान वाडकर, हॉटेल व्यावसायिक
Web Summary : LPG shortage due to global conflicts forces Shivganga Valley hoteliers to revert to wood-fired stoves. Customers enjoy the traditional taste, creating unexpected demand for 'chulha' cuisine. Small businesses fear closure if the gas crisis persists.
Web Summary : वैश्विक संघर्षों के कारण एलपीजी की कमी से शिवगंगा घाटी के होटल व्यवसायी लकड़ी के चूल्हों पर लौटने को मजबूर हैं। ग्राहकों को पारंपरिक स्वाद पसंद आ रहा है, जिससे 'चूल्हा' व्यंजनों की अप्रत्याशित मांग हो रही है। गैस संकट जारी रहने पर छोटे व्यवसायों को बंद होने का डर है।